इर्शाद - संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या स्वरचित कवितांची मुक्त मैफिल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१६

इर्शाद - संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या स्वरचित कवितांची मुक्त मैफिल | Irshad by Sandeep Khare and Vaibhav Joshi in Pune

इर्शाद - संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या स्वरचित कवितांची मुक्त मैफिल.

संदीप खरे आणि वैभव जोशी या आजच्या पिढीच्या दोन कवींची नावे मराठी रसिकांना सुपरिचित आहेत.

संदिपच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या विक्रमी कार्यक्रमाला गेली १३ वर्षे जगभरातल्या रसिकांनी भरभरून दाद दिली; तर वैभवच्या ‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमालाही रसिकांनी मनात स्थान दिले आहे. दोघांच्याही काव्यसंग्रहांना रसिकांनी व मान्यवरांनी गौरवले आहे. कवितेसोबतच सिनेमा, नाटक, मालिका, अल्बम्स यासाठीही दोघांनी लेखन केले असून; कवितेप्रमाणेच या कामालाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

‘इर्शाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने अगोदरच लोकप्रिय असकेल्या स्वरचित कवितांसोबतच अनेक नव्या कवितांचे सादरीकरण या कार्यक्रमात दोघे करणार आहेत. कवितेशी नाळ जुळलेल्या सर्व पिढीतील रसिकांसोबत रंगत जाणारी, कवितेसोबतच रसिकांशी अगदी अनौपचारिक संवाद साधणारी, गप्पा मारणारी ही मुक्त मैफिल आहे. इथे जुन्या कवितांच्या फर्माईशीं सोबतच नव्या कविताही ऐकता येणार आहेत. मैफिलीच्या ओघात दोघांना आवडलेल्या ज्येष्ठ कविंची कविताही भेटीस येऊ शकते! रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांचंही हार्दिक स्वागत आहे! एखादा कविमित्र मैफिलीला आलेला असेल तर त्यालाही थेट मंचावरून काही ऐकवण्याची विनंतीही होऊ शकते. थोडक्यात कार्यक्रमाची तथाकथीत चौकट मोडणारी, अगदी घरी जमावी तशी ही मुक्त मैफिल आहे!!

या दोघांचीही कविता आपापल्या स्वतंत्र पद्धतीने बोलते, पण त्यातली मनापासून लिहीण्याची प्रामाणिक तळमळ आणि ध्यास मात्र सारखाच आहे. दोघांच्या काव्य सादरीकरणाचेही अनेक चाहते आहेत! दोघांनाही एका मंचावर एकत्र पाहायला आवडेल, ही रसिकांची अनेक वर्षांची फर्माईश होती! त्यांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाने हा योग आता जुळून येतो आहे... त्यांनी इर्शाद म्हणताक्षणी कवितांची ही मुक्त मैफिल सुरू होणार आहे...!!

इर्शाद

दिनांक: १४ ऑगस्ट २०१६
वेळ: सायंकाळी ६ वाजता
स्थळ: एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.
घरपोच तिकिटांसाठी/कार्यक्रमासाठी संपर्क: ९८२३०६३२२१