आयुष्यावर बोलू काही - १४ वा वाढदिवस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जुलै २०१७

आयुष्यावर बोलू काही - १४ वा वाढदिवस | Aayushyavar Bolu Kahi 14th Birthday

आयुष्यावर बोलू काही - ५ ऑगस्ट २००३ साली सुरू झालेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम, लवकरच आपल्या वयाचा १४ वा गौरवशाली वाढदिवस साजरा करत आहे...

कविता, गाणी आणि गप्पांच्या माध्यमातून रसिकांशी थेट संवाद साधणारा हा एका वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम आहे, श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट, मन्स मोअर मिळविणारा एवढेच नव्हे तर चेहर्‍यावर कधी हसू तर कधी डोळ्यांतून पाणी दाद स्वरूपात मिळविणारा असा हा आगळा वेगळा कार्यक्रम आपला १४ वा वाढदिवस साजरा करत आहे.

‘तुमच्या लाडक्या कार्यक्रमाच्या १४ व्या वाढदिवसाला, तुमची उपस्थिती हवीच’ असे आव्हान संदीप खरे यांनी केले असुन. ‘खुप-खुप दिवसांनी तुमच्या लाडक्या कविता आणि गाणि ऐकायला नक्की या’ असे आव्हान सलील कुलकर्णी यांनी केले आहे.

आयुष्यावर बोलू काही

दिनांक: ५ ऑगस्ट २०१७
वेळ: सायंकाळी ५ वाजता
स्थळ: टिळक स्मारक मंदिर, पुणे
कार्यक्रमाच्या तिकिटांसाठी (२३ जुलै पासून): ९५९५८३०५५५
कार्यक्रम ठरवण्यासाठी: ९४२२३९७२६२