Download MarathiMati.com's New Android App from Google Play

पहिले जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलन, बीड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ मार्च २०१७

पहिले जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलन, बीड | 1st District Level Marathi Balsahitya Sammelan - Beed

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अंबेजोगाई, बीड आणि सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले जिल्हास्तरीय मराठी बालसाहित्य संमेलन दिनांक ९ आणि १० मार्च रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, प्रमुख अतिथी दत्ता बाळसराफ आणि वसंत काळपांडे, भारतभूषण क्षीरसागर, निलेश राऊत, कार्याध्यक्ष दीपा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

कार्यक्रमाची रूपरेषा

  • गुरूवार दिनांक ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रंथदिंडी
    मार्ग: माळीवेस - टिळकरोड - धोंडिपुरा - बलभीम चौक - कारंजा - राजूरीवेस - छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
  • सायंकाळी ६:३० च्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रम
  • शुक्रवार दिनांक १० मार्च रोजी सकाळी उद्घाटन सोहळा
  • दुपारी १ ते २ वाजता बाल साहित्यिकांचे कवीसंमेलन
  • दुपारी २ ते ३ वाजता बाल साहित्यिकांचे कथाकथन
  • दुपारी ३:३० ते ४:३० वाजता निमंत्रित लेखकांचे कथाकथन
  • दुपारी ४:३० ते ५:३० वाजता निमंत्रित कवींचे कवीसंमेलन
  • सायंकाळी ५:३० वाजता समारोप कार्यक्रम

अध्यक्ष डॉ. व्दारकादास लोहिया, उपाध्यक्ष श्री. दगडू लोमटे, सचिव नरेंद्र काळे, कोषाध्यक्ष उषाताई दराडे, अमीर हबीब यांनी सर्व रसिकांना या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा हि विनंती केली आहे.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play