ऑफिस बॉय झाला गीतकार
स्टार प्रवाहने दिला उभरत्या कलाकाराला महत्वपूर्ण ब्रेक.
गेल्या जवळपास एक दशकापासून स्टार प्रवाहने अनेक उत्तमोत्तम मालिका महाराष्ट्राला बहाल केल्या. या मालिकेंच्या निमित्ताने, स्टार प्रवाहने अनेक कलाकारांना लाँचही केले; मग ते प्रमुख अभिनेते असो, सहाय्यक अभिनेते असो, होतकरू निर्माते असो किंवा गायक, गीतकार, संगीतकार असो. योग्य त्या प्रतिभेला ओळखून, स्टार प्रवाह अशा कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे राहिले. स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या गीतकाराचीही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.
ऑफिस बॉय म्हणून काम करतानाच आपली कवितेची आवड जपत गीतकार होण्याचा प्रवास निलेश उजाळ या नव्या दमाच्या तरुण गीतकारानं केला आहे. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेचं टायटल साँग निलेश उजाळच्याच लेखणीतून उतरलं आहे. संगीतकारनिलेश मोहरीरनं आपलं एखादं तरी गाणं संगीतबद्ध करावं, हे त्याचं स्वप्नही या टायटल साँगच्या रुपानं स्टार प्रवाहने सत्यात उतरवले आहे.
स्टार प्रवाहवर २७ नोव्हेंबरपासून ‘नकळत सारे घडले’ ही नवी मालिका सुरू झाली. अभिनेता स्वप्नील जोशी याच्या जीसिम्स या संस्थेनं या मालिकेची निर्मिती केली आहे. स्वप्नील जोशी या मालिकेद्वारे निर्माता म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बालकलाकार सानवी रत्नाळीकर यांच्यासह अनेक उत्तम कलाकार या मालिकेत आहेत. या मालिकेचं टायटल साँगनिलेश उजाळ या नव्या दमाच्या गीतकारानं लिहिलं आहे. मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा निलेश उजाळचा हा पहिलाच प्रयत्न आहे हे विशेष.
निलेश उजाळ एके काळी ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. तो म्हणतो, ‘नकळत सारे घडले’ या मालिकेचं टायटल साँग लिहिण्याचा अनुभव फारच उत्तम होता. मी ज्या ऑफिसमध्ये काम करायचो, तिथले माझे सर माझ्या कवितेच्या आवडीला प्रोत्साहन द्यायचे. कवी संमेलनाला जाण्यासाठी सुट्टीही द्यायचे. स्टार प्रवाहच्या प्रोग्रामिंग हेड श्रावणी देवधर यांनी माझ्या काही कविता तिथंच वाचल्या होत्या. एके दिवशी त्यांनी मला बोलावून घेतलं. माझ्यासमोर एक कथा ठेवली आणि त्या कथेवर गाणं लिहायला सांगितलं. मी ती कथा वाचली आणि गाणं लिहून दिलं. श्रावणी ताईंना ते गाणं आवडलं आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकेचं टायटल साँग म्हणून आपल्यापुढे आलं. ‘मी खूपच नशीबवान आहे कि मला स्टार प्रवाह सारखी मोठी वाहिनी ही संधी देत आहे. यासाठी श्रावणी ताईंचा आणि स्टार प्रवाहचा मी ऋणी आहे.’ असं निलेश उजाळनं आवर्जून सांगितलं.
या गाण्याला संगीतबद्ध केले आहे निलेश मोहरीरीने. स्टार प्रवाहबरोबरचं निलेश मोहरीरचं नातं जुनं आहे. स्टार प्रवाहसाठी आजवर अंतरपाठ, तुजवीण सख्या रे, मांडला दोन घडीचा डाव, धर्मकन्या, पुढचं पाऊल, गणा धाव रे, दोन किनारे दोघी आपण, आराधना, स्वप्नांच्या पलीकडले पर्व २ आणि गोठ अशी एकूण दहा गाजलेली टायटल साँग निलेश मोहरीरनं केली आहेत. ‘नकळत सारे घडले’ या नव्या टायटल साँगविषयी निलेश मोहरीर म्हणाला, 'हे गाणं करण्याचा माझा अनुभव कमाल होता. स्वप्नील जोशीनं मला गाण्याचे शब्द पाठवले. मी शब्द वाचले आणि लक्षात आलं, की नेहमीच्या गीतकारांपैकी हे कोणी लिहिलेलं नाही. मग मी स्वप्नील जोशीला फोन करून गीतकाराबद्दल विचारलं. स्वप्नील जोशीनं मला निलेश उजाळबद्दल सांगितलं आणि मला सुखद धक्का बसला. कारण, त्यानं अत्यंत सोपे आणि ओघवते शब्द लिहिले होते. त्याच्या गाण्यावर मला फार मेहनत करावी लागली नाही. अगदी सहजपणे चाल सुचली. मला आनंद आहे कि हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. निलेश उजाळच्या कामाची चीज होत आहे असं म्हणायला हरकत नाही.'
आजवर उत्तमोत्तम मालिका आणि शीर्षक गीते देणाऱ्या स्टार प्रवाहवर नक्की पहा ‘नकळत सारे घडले’ सोमवार ते शनिवार सायं ७:३० वाजता!
शीर्षक गीताचे बोल: