लेक माझी लाडकी - विठूमाऊली चे महाएपिसोड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ डिसेंबर २०१७

लेक माझी लाडकी - विठूमाऊली चे महाएपिसोड | Lek Majhi Ladki - Vithu Mauli Maha Episode

लेक माझी लाडकी - विठूमाऊली चे महाएपिसोड - येत्या रविवारी २४ डिसेंबर रोजी स्टार प्रवाहतर्फे ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘विठूमाऊली’ च्या महाएपिसोडसची पर्वणी

स्टार प्रवाहवरील ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘विठूमाऊली’ या दोन लोकप्रिय मालिकांचा २४ डिसेंबर रोजी महाएपिसोड होणार आहे. आतापर्यंत असलेल्या रंजक कथानकाची आणि त्यातल्या प्रश्नांची उत्तरं या महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत. या दोन्ही मालिकांचे महाएपिसोड अनुक्रमे दुपारी १:०० आणि २:०० वाजता पाहता येतील.

‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत मीरा आणि ऋषिकेश यांच्यात संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत मीरानं प्रत्येक गोष्ट ऋषीला हवी तशी केली. ऋषी मात्र तिच्या मनासारखं वागत नसल्यानं मीरा चिडलेली आहे. ऋषी मीराला धडा शिकवण्यासाठी एक डाव खेळतो. त्याला मीरा कशी सामोरी जाते, कायम खंबीरपणे पाठीशी राहिलेला साकेत मीरासाठी काय करतो, मीरा आपल्याकडे परत यावी ही साकेतची इच्छा पूर्ण होते का या सगळ्या प्रश्नांचा उलगडा रविवारच्या महाएपिसोडमध्ये होईल.

‘विठूमाऊली’ या पौराणिक मालिकेला महाराष्ट्रानं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तिन्ही सांजेला विठूदर्शन होत असल्याने अल्पावधीतच ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. विठ्ठलाला तुळस प्रिय का आहे, हे सत्य उलगडणार आहे या विठ्ठल पर्वात. २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाएपिसोडमध्ये तुळशी माहात्म्य पहायला मिळणार आहे. सत्यभामा ही कलीच्या प्रभावाखाली आहे. त्या प्रभावातून विठ्ठल तिला कशा पद्धतीनं मुक्त करतात हे महाएपिसोडमध्ये दाखवलं जाणार आहे.

अतिशय रंजक वळणावर आलेल्या ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘विठूमाऊली’ या दोन्ही मालिकांत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच २४ डिसेंबर रोजी दुपारी १:०० आणि २:०० वाजता आणि रात्री ८:०० आणि ९:०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.