ये रे घना ये रे घना

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गाण्याचे शीर्षक: ये रे घना ये रे घना
गीतकार: आरती प्रभू
संगीतकार: हृदयनाथ मंगेशकर
गायक: आशा भोसले
गीत प्रकार: भावगीत

ये रे घना, ये रे घना ।
न्हाऊ घाल माझ्या मना ॥धृ॥

फुले माझी अळूमाळू वारा बघे चुरगळूं
नको नको म्हणताना गंध गेला रानावना ॥१॥

टाकुनिया घरदार नाचणार नाचणार
नको नको म्हणताना मनमोर भर राना ॥२॥

नको नको किती म्हणू वाजणार रे दूर वेणू
बोलावितो सोसाट्याचा वारा मला रसपाना ॥३॥