MarathiMati.com - Android App on Google Play Store

येणार साजण माझा

लेखन शांता शेळके | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: शांता शेळके
संगीतकार: पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक: उषा मंगेशकर
गीत प्रकार: -

शालू हिरवा पाच नि मरवा वेणी तिपेडी घाला
सजिणी बाई येणार साजण माझा !
गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा ! ॥धृ॥

चूलबोळकी इवलीइवली भातुकलीचा खेळ ग
लुटूपूटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशिमधागे ओढिति मागे व्याकुळ जीव हा झाला ॥१॥

सूर गुंफिते सनई येथे झडे चौघडा दारीं
वाजत गाजत मिरवत येईल घोड्यावरुनी स्वारी
मी वरमाला घालिन त्याला मुहूर्त जवळीं आला ॥२॥

मंगलवेळी मंगलकाळीं डोळां कां ग पाणी ?
साजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारीला बांधिन त्याचा शेला ॥३॥

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store