गीतरामायण

गीतरामायण | Geetramayan

गीतरामायण - [Geetramayan] वाल्मीकी महामुनि हे ‘आदिकवि’. त्यांनी रचलेले रामायण हे ‘महाकाव्य’. त्याचा नायक श्रीरामचंद्र हा ‘मर्यादा पुरुषोत्तम’. त्याचा सेवक श्री हनुमान हा ‘चिरंजीव’ दासोत्तम. रामाचे राज्य ‘आदर्श रामराज्य’. अशा प्रकारे श्रीरामकथा आमच्या भारताच्या दशदिशांमध्ये आज सहस्त्रों वर्षे दुमदुमून राहिली आहे. भारतीय संस्कृति रामरसांत सतत भिजत आलेली आहे. अशी रामकथा गाऊनआपली वाणी पवित्र करावी म्हणून अनेक कवींनी आणि नाटककारांनी आपली प्रतिभा सर्वस्वाने वेचली आहे. परिणामी रामसाहित्याचा हिमालयासारखा उत्तुंग संभर भाअर्तीय साहित्यात डौलाने उभा राहिलेला आहे. रामथांचे पाठ देणारे पुराणिक, रामकथा गाणारे कीर्तनकार, पिढ्यानपिढ्या भारतीय जनांच्या मनाचे मशागत करीत आलेले आहेत भारतातील सर्व भाषांत रामकथेचे गायन अहोरात्र चालू आहे. अधिक वाचा

कुश लव रामायण गाती | Kush Lav Ramayan Gaati

कुश लव रामायण गाती

मराठी गाणी

स्वये श्रीरामप्रभु ऐकती

कुश लव रामायण गाती ॥धृ॥

अधिक वाचा