MarathiMati.com - Android App on Google Play Store

तुला पाहते रे तुला पाहते

लेखन ग. दि. माडगूळकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: ग. दि. माडगूळकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक: आशा भोसले
गीत प्रकार: राग - भीमपलास

तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते ! ॥धृ॥

तुझ्या संगतीचा जिवा ध्यास लागे !
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते ! ॥१॥

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्‍न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते !

कधी भक्त का पाहतो ईश्वराला ?
नदी न्याहळी का कधी सागराला ?
तिच्यासारखी मी सदा वाहते ! ॥२॥

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store