MarathiMati.com - Android App on Google Play Store

लाजून हासणे अन्‌

लेखन मंगेश पाडगावकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: मंगेश पाडगावकर
संगीतकार: श्रीनिवास खळे
गायक: पं. हृदयनाथ मंगेशकर
गीत प्रकार: -

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे ॥धृ॥

डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीव घेणे, हरती जिथे शहाणे ॥१॥

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे ॥२॥

जाता समोरुनी तू उगवे टपोर ताता
देशातुनी फुलांच्या आणी सुगंधवारा
रात्रीच चांदण्याचे सुचते सुरेल गाणे ॥३॥

MarathiMati.com - Android App on Google Play Store