MarathiMati.com - Android App on Google Play Store

खेड्यामधले घर कौलारु

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार : अनिल भारती
संगीतकार : मधुकर पाठक
गायक : मालती पांडे
गीत प्रकार : भावगीत

आज अचानक एकाएकी । मानस लागे तेथे विहरु
खेड्यामधले घर कौलारु ॥धृ॥

पूर्व दिशेला नदी वाहते । त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येऊन मिळते । यौवन लागे उगा बावरु ॥१॥

माहेरची प्रेमळ माती । त्या मातीतून पिकते प्रीती
कणसावरची माणिक मोती । तिथे भिरभिरे स्मृती-पांखरु ॥२॥

आयुष्याची पाऊलवाटा । किती तुडविल्या येता जाता
परि आईची आठवण येता । मनी वादळे होति सुरु ॥

MarathiMati.com - Android App on Google Play Store