MarathiMati.com - Android App on Google Play Store

केव्हा तरी पहाटे

लेखन सुरेश भट | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार : सुरेश भट
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : पद्मजा फेणाणी - जोगळेकर
गीत प्रकार : राग - दुर्गा

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली ॥धृ॥

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली ॥१॥

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली ॥२॥

उरले उरांत काही आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली ॥३॥

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ति मग ओळ शेवटची सुचवून रात्र गेली ॥४॥ केव्हा तरी पहाटे …

MarathiMati.com - Android App on Google Play Store