Download MarathiMati.com's New Android App from Google Play

केशवा माधवा

लेखन रमेश अणावकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: रमेश अणावकर
संगीतकार: दशरथ पुजारी
गायक: सुमन कल्याणपूरकर
गीत प्रकार: राग - दुर्गा, पहाडी

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
तुझ्या नामात रे गोडवा ॥धृ॥

तुझ्या सारखा तूच देवा
तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी
ताराशी मानवा ……….॥१॥

वेडा होऊनी भक्तीसाठी
गोप गड्यासह यमुना काठी
नंदाघरच्या गाई हाकशी
गोकुळि यादवा……..॥२॥

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवाचा
पळविशी कौरवा ….॥३॥

Download MarathiMati.com's New Android App from Google Play