MarathiMati.com - Android App on Google Play Store

जिवलगा राहिले रे दूर घर माझे

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार : शांता शेळके
संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
गायक : आशा भोसले
गीत प्रकार : -
राग : श्री, पूरिया धनाश्री

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे !
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे ॥धृ॥

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोती दाटुन येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥१॥

गांव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे ॥२॥

निराधारा मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी ?
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे ॥३॥

MarathiMati.com - Android App on Google Play Store