पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

जीवनात ही घडी

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गाण्याचे शीर्षक: जीवनात ही घडी
गीतकार: यशवंत देव
संगीतकार: यशवंत देव
गायक: लता मंगेशकर
गीत प्रकार: चित्रपट गीत
चित्रपट: कामापुरता मामा
राग प्रकार: राग यमन

जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे ॥धृ॥

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्‍न खेळणे
स्वप्‍नातिल चांदवा जिवास लाभु दे ॥१॥

हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्षातुन अंग अंग धुंद होऊ दे ॥२॥

पाहु दे असेच तुला नित्य हासता
जाउ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे ॥३॥

Book Home in Konkan