Download MarathiMati.com's New Android App from Google Play

घन घन माला

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: ग. दि. माडगूळकर
संगीतकार: वसंत पवार
गायक: मन्ना डे
गीत प्रकार: चित्रपट गीत
चित्रपट : वरदक्षिणा
राग प्रकार : मल्हार

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ॥

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा ॥१॥

वर्षाकालिन सायंकाळी
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥

कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥

Download MarathiMati.com's New Android App from Google Play