गेले ते दिन गेले

लेखन भवानीशंकर पंडित | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: भवानीशंकर पंडित
संगीतकार: श्रीनिवास खळे
गायक: पं. हृदयनाथ मंगेशकर
गीत प्रकार: -

वेगवेगळी फुले उमलली
रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले
गेले, ते दिन गेले !

कदंबतरूला बांधुन दोला उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले
गेले, ते दिन गेले ! ॥१॥

हरितबिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले
अन्योन्यांनी किती झोकले
गेले, ते दिन गेले ॥२॥

निर्मलभावे नव देखावे भरुनी दोन्ही डोळे
तूमी मिळुनी रोज पाहिले
गेले, ते दिन गेले ! ॥३॥