Download MarathiMati.com's New Android App from Google Play

गगन सदन तेजोमय

लेखन मंगेश पाडगावकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: वसंत बापट
संगीतकार: पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक: लता मंगेशकर
गीत प्रकार: राग - तिलककामोद

गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय ॥धृ॥

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यांतून, तार्‍यांतून
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय ॥१॥

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतून
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय ॥२॥

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधूर गीत नवे
सकल-शरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय ॥३॥

Download MarathiMati.com's New Android App from Google Play