ज्ञानियांचा राजा

लेखन संत तुकाराम | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: संत तुकाराम
संगीतकार: राम फाटक
गायक: पं. भीमसेन जोशी
गीत प्रकार: -

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥धृ॥

मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण पायी बरी ॥१॥

ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे
इतर तुळणे काय पुढे ॥२॥

तुका म्हणे नेणे युक्तीचीया खोली
म्हणोनी ठेविली पायी डोई ॥३॥