MarathiMati.com - Official WhatsApp Number

चाफा बोलेना

लेखन मंगेश पाडगावकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: कवी ‘बी’
संगीतकार: वसंत प्रभू
गायक: लता मंगेशकर
गीत प्रकार: राग - यमन

चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ॥धृ॥

गेले आंब्याच्या वनी
म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे ॥१॥

गेले केतकीच्या वनी
गंध दरवळला वनीं नागासवे गळाले देहभान रे ॥२॥

चल ये रे ये रे गड्या
नाचू उडू घालू फुगड्या
खेळु झिम्मा झिम्‌ पोरी झिम्‌ पोरी झिम्‌ ॥३॥

हे विश्वाचे अंगण
आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघेजण ॥४॥

जन विषयाचे किडे
यांची धाव बाह्यकडे
आपण करु शुद्ध रसपान ॥५॥

चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी – चाफा ? कोठे दोघे जण रे ? ॥६॥

Book Home in Konkan