असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

प्रकाशन: संपादक मंडळ | ६ ऑक्टोबर २००८

गीतकार: राजा मंगळवेढेकर
संगीतकार: मीना खडीकर
गायक: रचना खडीकर, योगेश खडीकर, शमा खळे
गीत प्रकार: बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥धृ॥

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाई खार ॥१॥

गोल गोल लेमनच्या खिडल्या दोन
हॅलो हॅलो करायला छोटासा फोन
बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल ॥२॥

चांदीच्या झाडामागे चांदोबा राहातो
मोत्याच्या फुलातुन लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याला खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥३॥