ऐरणिच्या देवा तुला

लेखन जगदीश खेबूडकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: जगदीश खेबूडकर
संगीतकार: आनंदघन
गायक: लता मंगेशकर
गीत प्रकार: राग - भूप, नट

ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी आम्हावरी र्‍हाउ दे ॥धृ॥

लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जीनं व्होवं आबरुचं, धनी मातुर माजा देवा, वाघावानी असू दे ॥१॥

लक्शिमिच्या हातातली चवरि व्हावी वर खाली
इडापीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाउ दे ! ॥२॥

सुख थोडं, दुख्खं भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे ! ॥३॥