प्राजक्ता - भूषण करून देणार पहिल्या भेटीची आठवण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ मार्च २०१७

प्राजक्ता - भूषण करून देणार पहिल्या भेटीची आठवण | Prajakta Bhushan in Musical Album Feelings

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...

प्रेमाची हि लव्हस्टोरी प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या भेटीपासून सुरु होते. एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी ती पहिली भेट गरजेची असते. ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ च्या निमित्ताने प्रेमी युगलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे एक रोमँटिक गाणे युट्यूब वर व्हायरल होत आहे.

प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान या देखण्या जोडीवर आधारित असलेले हे गाणे आपल्या ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ ला अजून खास बनवणारे ठरत आहे. रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत ‘फिलिंग्स’ या म्युजीकल अल्बममधले हे गाणे स्वप्नील बांदोडकर यांनी गायले असून, दिग्दर्शन किरण खोत यांनी केले आहे. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे प्राजक्ता - भूषण वर आधारित हे गाणे प्रत्येक प्रेमी युगलांना नोस्टाल्जिक कारणारे ठरत आहे.