कॉलेज तरुणांच्या जीवनावर आधारित - यारों की यारी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जून २०१६

कॉलेज तरुणांच्या जीवनावर आधारित - यारों की यारी | Yaaro Ki Yaari - Marathi Movie Preview

चित्रपट: यारों की यारी (२०१६)
शैली: कॉमेडी, रहस्यमय
निर्माते: ए. के. एन्टरटेंन्मेट, अनुसया इंटरप्रायजेस
दिग्दर्शक: विनय भार्गव
कलाकार: किशोरी शहाणे, जयराज नायर, प्रसाद पंडित, सारा श्रवण, अजित साळवे, अष्मिता देशपांडे
प्रदर्शन दिनांक: २४ जून

सारांश


सारा श्रवण ‘दिल में मेरे, तुझ्या इश्काचा हॉर्न वाजला’ असं ती तीच्या आगामी “यारों की यारी” चित्रपाटामध्ये मस्त गाणं म्हणताना दिसतेय. यापूर्वी झंटलमन, धो धो पावसातील वन डे मॅच या चित्रपटातून सारा ला आपण पाहिले आहेच. छोट्या पडद्यावर सारा श्रवण हिने भाग्यलक्ष्मी, तू तिथे मी, महाराष्ट्राची लोकधारा, एका पेक्षा एक अप्सरा आली, एक मोहर अबोल, गंध फुलांचा गेला सांगून, पंचनामा, माधुरी मिडल क्लास, अनोळखी इत्यादी मालिकांमधून काम  करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता एका नव्या भूमिकेमध्ये तिला “यारों की यारी” च्या निमित्ताने आपण भेटू.

आत्ता पर्यंत अनेक महाविद्यालयीन आयुष्यावरील सिनेमातून मराठी सिनेप्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. याच शैलीतून महाविद्यालयीन आयुष्यावर आधारित नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सारा श्रवण हिच्यासह नवोदित कलाकार अजित साळवे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे आणि त्याचबरोबर अष्मिता देशपांडे ही  देखील महत्वाची भूमिका करत आहे. कॉलेजमधील तरुणांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात किशोरी शहाणे, जयराज नायर, प्रसाद पंडित हे देखील भूमिका साकारताना दिसतील.

“यारों की यारी” या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी  त्याला पसंती देखील दिली आहे. विनय भार्गव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केल असून, शेजू पॉल यांनी छायाचित्रकार म्हणून काम केल आहे. या सिनेमामधून कॉलेज जीवनातील अनेक मजेशीर किस्से तसेच प्रेम प्रसंगाचे चित्रीकरण केले आहे. “यारों की यारी” या सिनेमाची निर्मिती ए. के. एन्टरटेंन्मेट व अनुसया इंटरप्रायजेस यांनी केली आहे, या सिनेमासाठी श्री गुरुनाथ मिठबावकर याचं विशेष सहकार्य लाभल आहे. या आधी अनुसया इंटरप्रायजेस यांनी “मोहर” या सिनेमाची निर्मिती केली होती. हा “यारों की यारी” या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना धमाल, विनोदी, रहस्यमय कथा घेवून येत्या २४ जून २०१६ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर - प्रोमो