Download MarathiMati.com's New Android App from Google Play

ऑनलाइन बिनलाइन चित्रपटासाठी सोनू निगमचे वन टेक गाणे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ एप्रिल २०१५

ऑनलाइन बिनलाइन चित्रपटासाठी सोनू निगमचे वन टेक गाणे | Sonu Nigam Sings in One Take for Online Binline

बॉलिवूडचा एक संवेदनशील गायक सोनू निगम हा हिंदी हिट चित्रपटांच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने नुकतेच ऑनलाइन-बिनलाइन या मराठी चित्रपटासाठी गाणे गायले आहे.

सिद्धार्थ चांदेकर आणि ऋतुजा शिंदे या जोडीसाठी त्याने अत्यंत रोमंटिक गाणे स्लो ट्रॅकवर रेकॉर्ड केले आहे. या ड्युट गाण्याला अत्यंत भावपूर्ण व हळूवार अनुभूतींचा स्पर्श त्याने दिला असल्यामुळे त्याची श्रवणीयता मनाला आनंद देणारी आहे. हे गाणे ध्वनीमुद्रित होताना त्याने त्याला योग्य न्याय दिल्याचे त्यातून जाणवते. हे संपूर्ण गाणे त्याने एका टेकमध्ये पूर्ण केले, हे विशेष. स्लो मोशनमध्ये गाणे गाण्याचा त्याचा युएसपी त्याने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. सोबतच्या कलाकरांसमवेतची त्याची केमिस्ट्री चांगली जुळून आली होती. या गाण्याचे एडिटिंग झाल्यानंतर निर्माते श्रेयस जाधव यांनी तर सोनू निगमचे गाणे हे सूर्यप्रकाशातून प्रतिबिंबत झालेल्या इंद्रधनुप्रमाणे भासत असल्याची उपमा देऊन प्रशंसा केली. त्याचबरोबर सिद्धार्थ चांदेकर यांनीही हे गाणे पडद्यावर साकारण्यासाठी उत्तम साथ दिली. ऑनलाइन-बिनलाइन चित्रपट केदार गायकवाड दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, ऋतुजा शिंदे आदी कलाकार आहेत.
हा चित्रपट जून २०१५ मध्ये प्रदर्शित होत आहे.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play