ऑनलाईन बिनलाईन मध्ये मराठीतले जय - विरू

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ डिसेंबर २०१४

ऑनलाईन बिनलाईन मध्ये मराठीतले जय - विरू | Marathi Jai - Veeru in Online Binline

सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत डोमे हे पुन्हा एकदा श्रेयस जाधव निर्मित ऑनलाईन बिनलाईन या रॉम - कॉम(romance & comedy) पटातून परत येत आहेत.

लागोपाठ दोनवेळा हीट दिल्यानंतर मराठी माणसांच्या हृदयावर स्थान मिळवणारे सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत डोमे हे पुन्हा एकदा श्रेयस जाधव निर्मित ऑनलाईन बिनलाईन या रॉम - कॉम(romance & comedy) पटातून परत येत आहेत. या चित्रपटाचे ठळकपण म्हणजे केदार गायकवाड हे त्याचे दिग्दर्शन करत आहेत. एका नव्या संकल्पनेवर आधारित त्याचे निर्मिती आहे. ऑनलाईन बिनलाईन हा एक सहजसुंदर मनोरंजन करणारा विनोदी चित्रपट आहे. जय - वीरू यांच्या गाजलेल्या जोडीनंतर विनोदाची निर्माण झालेली पोकळी त्यामुळे भरून निघणार आहे. आजच्या युवकांमध्ये इंटरनेटचे वाढलेले प्रमाण या संकल्पनेतून त्याची पटकथा तयार करण्यात आली आहे.