लग्न पहावे करून

लेखन संपादक मंडळ | प्रकाशक संपादक मंडळ | ३ ऑक्टोबर २०१३

लग्न पहावे करून

‘लग्न पहावे करून’ ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.

उमेश कामत, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर, तेजश्री प्रधान, जयंत सावरकर आणि स्वाती चिटणीस यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा स्वत: अजय नाईकचीच असून पटकथा व संवाद समीर विद्वांस व क्षितीज पटवर्धन यांचे आहेत.

अजय नाईक, वैभव जोशी, अंबरिश देशपांडे आणि क्षितीज पटवर्धन यांच्या गाण्यांना अजय नाईकने संगीत दिले असून शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, बेला शेंडे व आक्रिती कक्कड यांनी ही गाणी गायली आहेत.

‘सोलॅरिझ इंटरनॅशनल’ आणि ‘स्प्रिंट आर्ट्स क्रिएशन’ या निर्मिती संस्थांद्वारे किरण देशपांडे, मोहन दामले, संजीव लंगरकांडे आणि आशिष देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.