Download MarathiMati.com's New Android App from Google Play

वडील आणि मुलीची गोष्ट - दमलेल्या बाबाची कहाणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जून २०१६

वडील आणि मुलीची गोष्ट - दमलेल्या बाबाची कहाणी | Damlelya Babachi Kahani - Marathi Movie Preview

चित्रपट: दमलेल्या बाबाची कहाणी (२०१६)
शैली: ड्रामा
निर्माते: विशाल धनावडे, नितीन चव्हान
दिग्दर्शक: योगेश जाधव, नितीन चव्हान
कलाकार: संदीप खरे, किशोर कदम, संस्कृती बल्गुडे, अस्ताद काळे, दिप्ती भागवत, प्रवीन तरडे, ज्योती चांदेकर, किशोर चौगुले, भाग्यश्री देसाई, मुक्ता करंदिकर, मिलिंद शिंत्रे, श्रेया पासलकर
प्रदर्शन दिनांक: २४ जून

सारांश


गजाभाऊ : आपली मुग्धा आपल्याला... मला समजून घेईल कां गं ? की रागच करेल ती आपल्या बापाचा ?
आई : शांत व्हा, विचार नका करू आत्ता... खूप जीव आहे पोरीचा तुमच्यावर.
गजाभाऊ : खरंच ?
मुग्धा : माझे बाबा ना, जगातले सर्वात चांगले बाबा आहेत !

हे असं असतं बाप लेकीचं नातं. आई ही आई असते. पुढे जाता मैत्रीणही होते. पण बाबा ??
बापासाठी त्याची मुलगी कधी बाहुली असते. कधी परीराणी असते. कधी राजकन्या असते तर थोडी मोठी झाल्यावर ती मैत्रीणही असते. आणि म्हातारपणी ? म्हातारपणी मुलगी आपल्या बाबाची आईसुद्धा होते . असं हे गहिरं, वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं नातं.

समाजातला प्रत्येक बाप आपल्या मुलीच्या बाबतीत असाच हळवा, प्रेमळ, जबाबदार आणि प्रसंगी मित्र देखील असतो.
हाच बाप, पुरुष देखील असतो. तो समाजात कसा वावरतो? समाज हा लोकांनी बनलेला असतो. काय मत असतं या समाजाचं स्त्रियांच्या बद्दल ? हा समाज, स्त्रीयांच्याकडे आधी ‘माणूस’ म्हणून पाहू शकतो कां ? कि नको असलेली किंवा वापरायची वस्तू म्हणून पाहतो ? असे खूप प्रश्न पडलेत गजाभाऊंना. त्यांनी या प्रश्नांचं उत्तर एका खडतर प्रवासानंतर शोधलंय. तुम्हाला व्हायचंय या प्रवासाचं साक्षीदार ?

ट्रेलर - प्रोमो


Download MarathiMati.com's New Android App from Google Play