निलेश कुंजीर आणि त्याचा विळखा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ ऑक्टोबर २०१४

निलेश कुंजीर आणि त्याचा लघुपट विळखा | Nilesh Kunjir talking about his Short Film Vilkha

निलेश कुंजीर[Nilesh Kunjir] याने दिग्दर्शित केलेला विळखा हा लघुपट १२ नोव्हेंबरला Lahore international children short film festival, Lahore येथे दाखवण्यात येणार आहे. त्याबद्ल त्याच्याशी केलेली बातचित[Interview].

निलेश प्रथमतः ‘विळखा’ च्या अभुतपुर्व यशासाठी तुझे अभिनंदन.

दिग्दर्शक म्हणून सुरुवात कशी झाली?
धन्यवाद हर्षद.
लहानपणापासून फिल्म आणि चित्रपट याची खूप आवड होतीच पण या क्षेत्राची इतकी माहिती नव्हती. त्यासाठी २००८ ला आम्ही ‘वळणावरती’ या लघुपटाची निर्मिती केली. पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये संजय खापरे सारखे अनुभवी कलाकार आम्हाला लाभले. तो लघुपट करताना आलेला अनुभव खूप काही देऊन गेला. आपण एखादा चित्रपट पाहतो आवडला नाही तर नाव ठेवून मोकळे होतो पण प्रत्येक कलाकृती मागे किती लोकांचे कष्ट असतात, त्यामागे किती मेहेनत असते याचा प्रत्यय आला. त्यानंतर आत्तापर्यंत आलेल्या सर्व चांगल्या वाईट सिनेमातल्या फक्त चांगल्या आणि शिकण्यासारख्या गोष्टी बघतो आणि लक्षात ठेवतो.

‘वळणावरती’ मध्ये कथा हा माझी आणि माझ्या सहकार्यांची होती दिग्दर्शक आमचे मित्र होते. त्यावेळी एक नवीन टीम तयार झाली ज्याची आज चित्रपट बनवताना सर्वात मोठी गरज असते. तुमच्याकडे चांगली टीम असेल तर तुमचे काम सोपे होते. २०१२ रोजी आम्ही वननेस फिल्म्स या नावाने प्रॉडक्शन सुरू केले आणि ‘भ्रम’ नावाचा पहिला लघुपट केला. दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिला लघुपट. त्यात माझा शाळेतला मित्र अमृत अमरनाथ हा निर्माता म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला. लघुपट बनवताना तुमच्याकडे विषय असतो, कलाकार आणि इतर सर्व गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात पण त्यासाठी लागणारा निर्माता सर्वात महत्वाचा असतो. कारण लघुपटातून आर्थिक फायदा होईलच याची शाश्वती नसते.

भ्रम नंतर पुढे काय केलेस?
यानंतर आम्ही मागे वळून पहिलेच नाही आता पर्यन्त तब्बल ७ विविध प्रॉजेक्ट्स आम्ही केले आहेत. त्यात महिंद्रा कंपनीसाठी बनवलेली ‘आय कॅन’, गर्जा महाराष्ट्र गाणे जे जय महाराष्ट्र न्युज चॅनल वर मे २०१३ रोजी प्रदर्शित झाले, रेन ऑफ लव्ह आणि गर्जा महाराष्ट्र ही गाणी ९ एक्स झकास आणि मायबोली चॅनल वर दाखवली जातात त्यातले रेन ऑफ लव्ह हे गाणे बाबूल सुप्रियो यांनी गायले आहे.

त्यानंतर विळखा हा लघुपट मी बनवला. माझ्यासाठी तसेच आमच्या पूर्ण टीम साठी खूप महत्वाचा टप्पा ठरला आहे कारण आता पर्यन्त तब्बल ६ शॉर्ट फिल्म फेस्टिवल ला ही फिल्म पाठवली आणि सर्व ठिकाणी या फिल्म ची निवड झाली आहे. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून काम करत राहिलात तर निश्चितच त्याच योग्य ते फळ मिळत याचा उत्तम नमुना म्हणजे हा लघुपट.

विळखा विषयी थोडक्यात सांग?
हिमाली दिघे या माझ्या मैत्रिणीने एकदा सहज मला एक कथा ऐकवली आणि त्याच क्षणी या विषयावर लघुपट बनवायचा हे मी पक्क केलं. सध्या लहान मुलांवर होणारे लैगिंक अत्याचार हा खरचं चिंतेचा विषय बनला आहे आणि अशावेळी आपण त्यासाठी काही करु शकतो असे मनात आले. विळखासाठी जवळ जवळ वर्षभर तयारी करत होतो... पण पुन्हा गाडी येवून थांबली ती पैश्याजवळ. तस पहायला गेले तर लघुपट खूप कमी पैश्यात सुध्दा होऊ शकतो. परंतु मला कोणत्याही तांत्रिक बाबींमध्ये कमी पडायचे नव्हते शेवटी माझ्या परिवारातले काही सदस्य आणि मित्र मिळून मला मदत केली आणि ‘विळखा’ लघुपट पूर्ण झाला. यात एकूण ६ निर्माते आहेत. मी, प्रशांत कुंजीर, स्नेहल कुंजीर, निलेश बाबर, अमोद भिसे, आणि अमित शिंदे. या सर्वांनी तयारी दाखवली आणि त्याचमुळे आज विळखा नवनवीन शिखर गाठते आहे.

हा लघुपट आम्ही पूर्णतः आब्स्ट्रॅक्ट पद्धतीने केला आहे.. म्हणजे मुलगी किंवा तिच्यावर अतिप्रसंग करणार्‍या चेहेरा न दाखवता लाइट्स आणि विज्वल्स या वरूनच तिथे घडणार्या प्रसंगाची एकंदर लोकांना कल्पना येते त्यामुळे ती पाहताना कोणाला अश्लील अशी कोणतीच गोष्ट पाहिल्याची भावना निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतली.

आतापर्यंत कोणकोणत्या फेस्टिवल ला विळखा हा लघुपट दाखवला गेला आहे?
AGOG Short Film Festival - Navi Mumbai, Iconoclast National level short film festival - Navi Mumbai, Samyak short film festival, AIM International SHORT FILM Carnival – Dadar, Mumbai, 1st Goa Short Film Festival 2014 – Panji, Goa आणि पुढच्या महिन्यात १२ नोव्हेंबर ला Lahore international children short film festival, Lahore येथे ती दाखवण्यात येणार आहे.

विळखा ला आतापर्यंत २ अवॉर्डस् लागले आहेत. AGOG Short Film Festival येथे कथा-पटकथेसाठी, आणि AIM International SHORT FILM Carnival येथे बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्मचा.

AIM International SHORT FILM Carnival येथे पूर्ण जगातून निवडण्यात आलेल्या शेवटच्या १० लघुपटामध्ये ‘विळखा’ ही एकमेव भारतीय फिल्म होती ही आम्हाला मिळालेली आमच्या कामाची सर्वात मोठी पावती होती.

मी इथे सर्वांची नाव घेवू शकत नाही एक सांगतो की हा पूर्णपणे माझ्या टीम चा पुरस्कार आहे. वननेस शी जोडला गेलेला प्रत्येक व्यक्ती तितकाच महत्वाचा आणि खास आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार.

नवीन कोणत्या प्रोजेक्टवर काम करतो आहेस?
आला मल्हार रुतू या सारेगामाच्या अल्बम मधले जावेद अली यांनी गायलेले एक मराठी गीताचे चित्रीकरण नुकतेच कराड येथे चित्रित झाले त्याचे दिग्दर्शन मी केले आहे लवकरच ते गाणे सर्वत्र प्रदर्शित होईल. माझे मित्र प्रतापसिंह शिंदे यांनी त्याची गीते लिहिली आहेत आणि शशी ने ती संगीरबद्ध केली आहेत. सध्या सर्वांना हे गाणे युट्युब वर Saregama च्या regional channel वर पाहता येईल.

फिल्म कधी करतोयस?
लवकरच. त्यासाठी तयारी सुरू केली आहे. आता पर्यन्त केलेल्या कामावरून एक मनात पक्क झालय की तुमचा विषय जर चांगला असेल आणि मनात जिद्द असेल तर कठीण असे काही नाही. कोणतेही काम करताना नुसती मेहेनत कामाची नाही त्या विषयाची आवड असणं गरजेचं. नेमक सांगायचं तर ‘खाज’ असली पाहिजे मग सार काही तुम्हाला हवं तसे घडू शकते. आणि हो अजून एक गोष्ट निर्माता सर्वात महत्वाचा असतो आणि आता त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे तरचं आजच्या तरुणाई मध्ये असलेलं आणि लोकांना हवं असलेलं नावीन्य जगापुढे येईल.