Download MarathiMati.com's New Android App from Google Play

नकळत दिसले सारे नाटकाचा मुहूर्त

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ ऑक्टोबर २०१३

नकळत दिसले सारे नाटकाचा मुहूर्त

या नाटकात प्रशांत दामले प्रथमच अंध व्यक्तिरेखा सकारात आहेत.

प्रशांत दामले यांच्या ‘नकळत दिसले सारे’ या नवीन नाटकाचा मुहूर्त मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी अनोख्या पद्धतीने झाला. यशाच्या शिखरावर, प्रसिद्धीच्या झोतात असताना अचानक आलेल्या अंधत्वामुळे सैरभैर झालेल्या नायकाला जगण्याची नवी ‘दृष्टी’ जन्मांध व्यक्ती कशी देते, या कथासुत्रावर आधारित असलेल्या या नाटकात प्रशांत दामले प्रथमच अंध व्यक्तिरेखा सकारात आहेत.

जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून, अंधत्वावर मात करून सन्मानाने आयुष्य जगणाऱ्या काही मान्यवरांच्या उपस्थितीत नाटकाचा मुहूर्त करण्यात आला. नुपूर जोशी या अंध मुलीच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. या प्रसंगी नुपूरच्या शिक्षिका व 'नॅब'च्या केंद्र प्रमुख संपदा पळनीटकर, 'नॅब'चे मानद सचिव आनंद आठलेकर, अंध व्यक्तींना संगणक प्रशिक्षण देणारे श्री. दाभोळकर आणि अंधांसाठी एटीएम बनवणारे प्रशांत नाईक उपस्थित होते.

‘झी २४ तास’चे मुख्य संपादक उदय निरगुडकर हे ही या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play