९ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ सप्टेंबर २०१३

९ सप्टेंबर दिनविशेष(September 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

सचिन तेंडुलकर - सचिन रमेश तेंडुलकर (एप्रिल २४, १९७३ : मुंबई) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. पद्म विभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला गेला आहे. सचिनला भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला.

जागतिक दिवस


 • १९४८ : प्रजासत्ताक दिन : उत्तर कोरिया.
 • १९९१ : स्वातंत्र्य दिन : ताजिकिस्तान.

ठळक घटना/घडामोडी


 • १५४३ : मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.
 • १७७६ : अमेरिकेची अधिकृ्तरित्या देश म्हणून घोषणा करण्यात आली.
 • १९४५ : दुसर्‍या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.
 • १९४८ : उत्तर कोरिया: प्रजासत्ताक दिवस
 • १९८५ : मूक-बधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
 • १९९१ : ताजिकिस्तानला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले.
 • १९९४ : सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले.
 • २००१ : नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमद शाह मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
 • २००१ : व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

जन्म/वाढदिवस


 • २१४ : ऑरेलियन, रोमन सम्राट.
 • ३८४ : फ्लाव्हियस ऑनरियस, रोमन सम्राट.
 • १८२८ : काऊंट लिओ टॉलस्टॉय, रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.
 • १८५३ : फ्रेड स्पॉफोर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८५५ : अँथोनी फ्रांसिस लुकास, खनिजतेल शोधक.
 • १८७८ : सर्जियो ओस्मेन्या, फिलिपाईन्सचा चौथा राष्ट्राध्यक्ष.
 • १८९४ : बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
 • १९२२ : हान्स जॉर्ज डेह्मेल्ट, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९४१ : डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
 • १९४९ : ज्यो थाइसमान, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
 • १९६७ : अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
 • १९७४ : विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.
 • १९७४ : क्वोक वान, ब्रिटिश फॅशन-संकल्पक.
 • १९८६ : जस्टिस चिभाभा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ७०१ : संत सर्जियस पहिला.
 • १००० : ओलाफ पहिला, नॉर्वेचा राजा.
 • १०८७ : विल्यम पहिला, इंग्लंडचा राजा.
 • १३९८ : जेम्स पहिला, सायप्रसचा राजा.
 • १४८७ : चेंगह्वा, चिनी सम्राट.
 • १५१३ : जेम्स चौथा, स्कॉटलंडचा राजा.
 • १९०९ : एडवर्ड हेन्री हॅरीमान, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
 • १९७६ : माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
 • १९८० : जॉन ग्रिफिन, अमेरिकन लेखक.
 • १९८५ : पॉल फ्लोरी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
 • १९९० : सॅम्युएल डो, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००१ : अहमद शाह मसूद, अफगाण नेता.
 • २०१० : वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.