७ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ सप्टेंबर २०१३

७ सप्टेंबर दिनविशेष(September 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

इला भट्ट - इला रमेश भट (७ सप्टेंबर, इ.स. १९३३) या भारतातील असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य इला भट यांनी केले आहे.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • ११९१ : तिसरी क्रुसेड - इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल्याने सलाद्दिनला हरवले.
 • १८२१ : ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
 • १९२९ : फिनलंडमध्ये जहाज बुडून १३६ मृत्युमुखी.
 • १९४० : दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
 • १९४३ : दुसरे महायुद्ध - जर्मनीची पूर्व आघाडीवरुन पीछेहाट सुरू झाली.
 • १९४३ : ह्युस्टनमध्ये हॉटेलला आग लागून ५५ ठार.
 • १९४३ : ह्युस्टनमध्ये हॉटेलला आग लागून ५५ ठार.
 • १९४५ : दुसरे महायुद्ध - जपानच्या सैन्याने ने वेक द्वीपावर आत्मसमर्पण केले.
 • १९५३ : निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.
 • १९७९ : क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
 • १९९८ : लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
 • १९९९ : अथेन्समध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.९ तीव्रतेचा भूकंप. १४३ ठार, ५०० जखमी.
 • २००४ : हरिकेन आयव्हन हे ५व्या प्रतीचे चक्रीवादळ ग्रेनडावर आले. ३९ ठार. ग्रेनडातील ९०% इमारतींना नुकसान.
 • २००५ : इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

जन्म/वाढदिवस


 • १५३३ : एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची, इंग्लंडची राणी.
 • १८३६ : हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १८४९ : बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, हिंदुस्थानी संगीत परंपरेतील एक थोर प्रतिभावंत गायक.
 • १८५७ : जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८७१ : जॉर्ज हर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८९४ : व्हिक रिचर्डसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९११ : टोडोर झिव्कोव्ह, बल्गेरियाचा हुकुमशहा.
 • १९१२ : डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.
 • १९१४ : नॉर्मन मिचेल-इनेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३० : बोद्वॉँ पहिला, बेल्जियमचा राजा.
 • १९३३ : इला भट, मॅगसेसे पुरस्कार विजेत्या, भारतीय समाजसेविका ‘सेवा’ या संस्थेच्या संस्थापिका.
 • १९३६ : बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार.
 • १९४० : चंद्रकांत खोत, लघुनियतकालिकांच्या इतिहासातील एक महत्वाचे कवी, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक.
 • १९५१ : मामुट्टी, प्रसिद्ध मल्याळी अभिनेता.
 • १९५५ : अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९५९ : केव्हन करान, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६४ : नुरुल आबेदिन, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
 • १९६७ : स्टीव जेम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९८४ : फरवीझ महरूफ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १३१२ : फर्डिनांड चौथा, कॅस्टिलचा राजा.
 • १४९६ : फर्डिनांड दुसरा, नेपल्सचा राजा.
 • १५५२ : गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.
 • १६३२ : सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.
 • १७७७ : टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.
 • १८०९ : बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.
 • १९५३ : भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.
 • १९९७ : मोबुटु सेसे सेको, झैरचा हुकुमशहा.