२७ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ सप्टेंबर २०१३

२७ सप्टेंबर दिनविशेष(September 27 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

भगतसिंग - २३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो.

जागतिक दिवस


 • जागतिक प्रवासी दिन.

ठळक घटना/घडामोडी


 • १५४० : पोप पॉल तिसर्‍याने सोसायटी ऑफ जीझसला (जेसुइट्स) मान्यता दिली.
 • १५९० : अवघे १३ दिवस सत्तेवर राहिल्यावर पोप अर्बन सातव्याचा मृत्यू.
 • १७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.
 • १८२१ : मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
 • १८२५ : द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
 • १८५४ : एस.एस. आर्क्टिकला अटलांटिक महासागरात जलसमाधी. ३०० मृत्युमुखी.
 • १९०५ : ऍनालेन डेर फिजिकमध्ये अल्बर्ट आइनस्टाइनचा एखाद्या वस्तूचे जडत्व त्यातील उर्जाप्रमाणावर अवलंबून असते का? हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यात आइन्स्टाईनने E=mc2 हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
 • १९२२ : ग्रीसच्या राज कॉन्स्टन्टाईन पहिल्याने पदत्याग केला. त्याचा मुलगा जॉर्ज दुसरा सत्तेवर.
 • १९४० : जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० ठार.
 • १९५९ : जपानच्या त्रिपक्षी तह स्वीकारला.
 • १९९६ : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानीने पळ काढला तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.
 • २००२ : पूर्व तिमोरला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
 • २००२ : मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरूवात.

जन्म/वाढदिवस


 • १३८९ : कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.
 • १६०१ : लुई तेरावा, फ्रांसचा राजा.
 • १७२२ : सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारी.
 • १९०७ : भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी.
 • १९४८ : डंकन फ्लेचर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९५३ : माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू.
 • १९५७ : बिल ऍथी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६२ : गॅव्हिन लार्सन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७२ : ग्वेनेथ पाल्ट्रो, अमेरिकन अभिनेत्री.
 • १९७४ : पंकज धर्माणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९८१ : लक्ष्मीपती बालाजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९८१ : ब्रेन्डन मॅककुलम, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १५५७ : गो-नारा, जपानी सम्राट.
 • १५९० : पोप अर्बन सातवा.
 • १७०० : पोप इनोसंट बारावा.
 • १९१७ : एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.
 • १९७२ : एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.
 • १९९६ : नजीबुल्लाह, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००८ : महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.