२९ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ सप्टेंबर २०१३

२९ सप्टेंबर दिनविशेष(September 29 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

हमीद दलवाई - (सप्टेंबर २९, १९३२ - १९७७) हे मुस्लिम समाजसुधारक, मराठी साहित्यिक होते. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले.

जागतिक दिवस


 • संशोधक दिन : आर्जेन्टिना.

ठळक घटना/घडामोडी


 • १२२७ : क्रुसेडमध्ये भाग न घेतल्याबद्दल पोप ग्रेगोरी नवव्याने पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक दुसर्‍याला वाळीत टाकले.
 • १९११ : इटलीने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९१६ : जॉन डी. रॉकफेलर पहिला अब्जाधीश (अमेरिकन डॉलरमध्ये) झाला.
 • १९१८ : पहिले महायुद्ध - बल्गेरियाने शरण मागितली.
 • १९४१ : ज्यूंचे शिरकाण - क्यीवमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
 • १९४३ : दुसरे महायुद्ध - इटलीने शस्त्रे खाली ठेवली.
 • १९९१ : हैतीमध्ये लश्करी उठाव.
 • २००५ : जॉन रॉबर्ट्स जुनियर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी.
 • २००६ : गोल त्रांसपोर्तेस एरोस फ्लाइट १९०७ हे विमान एम्ब्राएर लेगसी प्रकारच्या विमानाशी ब्राझिलच्या पेइहोतो दि अझेवदो शहराजवळ धडकले. १५४ ठार.
 • २००८ : लेहमान ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला.
 • २००९ : सामो‌आजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप आणि त्सुनामी.

जन्म/वाढदिवस


 • १७८६ : ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • १८७६ : चार्ल्स लेवेलिन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १८९० : ल. गो. उर्फ नानाशास्त्री दाते, पंचांगकर्ते.
 • १९०१ : एन्रिको फर्मी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९३० : रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९३२ : हमीद दलवाई, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.
 • १९३४ : लान्स गिब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९३४ : लिंडसे क्लाइन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९३६ : सिल्व्हियो बेर्लुस्कोनी, इटलीचा पंतप्रधान.
 • १९३८ : विल्यम कॉक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
 • १९४१ : डेव्हिड स्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४३ : लेक वालेंसा, पोलंडचा पंतप्रधान.
 • १९५० : डेव्हिड मरे, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५१ : मिशेल बाशेलेट, चिलीची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष.
 • १९५६ : सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू.
 • १९५७ : क्रिस ब्रोड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७८ : मोहिनी भारद्वाज, अमेरिकन जिम्नॅस्ट.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १५६० : गुस्ताव पहिला, स्वीडनचा राजा.
 • १८३३ : फर्डिनांड सातवा, स्पेनचा राजा.
 • १९८७ : हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.
 • १९९१ : उस्ताद युनुस हुसेन खान, उत्तर प्रदेशातील आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक.
 • २००१ : न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००६ : वॉल्टर हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.