MarathiMati.com - Android App on Google Play Store

२८ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २८ सप्टेंबर २०१३

२८ सप्टेंबर दिनविशेष(September 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

लता दीनानाथ मंगेशकर - (जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९) भारताच्या महान गायिका आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणाऱ्या गायक-गायिकांमध्ये लताबाईंचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जागतिक दिवस


  • चेक राष्ट्र दिन : चेक प्रजासत्ताक.
  • शिक्षक दिन : तैवान.

ठळक घटना, घडामोडी


  • ४८ : इजिप्तचा राजा टॉलेमीने पॉम्पेई द ग्रेटची इजिप्तमध्ये उतरल्यावर हत्या करवली.
  • १९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा काढून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर जर्मनी व सोवियेत संघाने पोलंडचा आपसांत वाटणी करून घेतली.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सॉ काबीज केली.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने एस्टोनियातील क्लूगा कॉँसेन्ट्रेशन कॅम्पमधील कैद्यांची सुटका केली.
  • १९५८ : फ्रांसने नवीन संविधान स्वीकारले. फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताकअस्तित्त्वात आले. गिनी या फ्रांसाधीन प्रदेशाने हे संविधान न स्वीकारता स्वतंत्र होण्याचे ठरवले.
  • १९५९ : भारताची आरती शहा ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली आशियाई महिला ठरली
  • १९७१ : युनायटेड किंग्डमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले.
  • १९९४ : एम.एस. एस्टोनिया ही फेरीबोट बाल्टिक समुद्रात बुडुन ८५२ व्यक्ती मृत्युमुखी पडले.
  • १९९५ : कोमोरोस द्वीपांवर लश्करी उठाव.
  • २००४ : कॅलिफोर्नियातील पार्कफील्ड शहराला रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का.

जन्म, वाढदिवस


  • ५५१ : कॉन्फ्युशियस, चीनी तत्त्वज्ञानी.
  • १८६७ : कीचिरो हिरानुमा, जपानी पंतप्रधान.
  • १९२५ : सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
  • १९२९ : लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक.
  • १९४६ : मजिद खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ : शेख हसीना वाजेद, बांगलादेशची पंतप्रधान.
  • १९६० : ऑगस्टिन लोगी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ : इरफान भट्टी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६७ : मीरा सोर्व्हिनो, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९७१ : मॅथ्यू इलियट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : कॅथ्रिन लेंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : कॉलिन स्टुअर्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८७ : हिलरी डफ, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • २३५ : पोप पॉँटियानस.
  • ११०४ : पेद्रो पहिला, अरागॉनचा राजा.
  • ११९७ : हेन्री सहावा, पवित्र रोमन सम्राट.
  • १९१४ : रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती.
  • १९६८ : बाळकृष्ण गणेश खापर्डे, चरित्रकार, वाड्.मय विवेचक.
  • १९७० : गमाल अब्दल नासर, इजिप्तचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७८ : पोप जॉन पॉल पहिला.
  • १९७९ : रोम्युलो बेटानकोर्ट, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९८९ : फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९१ : माइल्स डेव्हिस, अमेरिकन जॅझ संगीतकार.
  • २००० : पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.
MarathiMati.com - Android App on Google Play Store