२२ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ सप्टेंबर २०१३

२२ सप्टेंबर दिनविशेष(September 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

दुर्गा खोटे - (जानेवारी १४, इ.स. १९०५ - सप्टेंबर २२, इ.स. १९९१) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या.

जागतिक दिवस


 • स्वातंत्र्य दिन : बल्गेरिया (ऑट्टोमन साम्राज्यापासून, १९०८), माली (फ्रांसपासून, १९६०)

ठळक घटना/घडामोडी


 • १५२० : ऑट्टोमन सम्राट सलीम पहिल्याच्या मृत्युपश्चात सुलेमान पहिला सम्राटपदी.
 • २००३ : नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले.
 • २०१३ : पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले.

जन्म/वाढदिवस


 • १७९१ : मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८२९ : टु डुक, व्हियेतनामचा राजा.
 • १८७६ : आंद्रे तार्द्यू, फ्रांसचा पंतप्रधान.
 • १८७८ : योशिदा शिगेरू, जपानचा पंतप्रधान.
 • १८८२ : विल्हेम कायटेल, जर्मन फील्डमार्शल.
 • १८८५ : बेन चीफली, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
 • १८८७ : कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक.
 • १९१५ : अनंत माने, चित्रपट दिग्दर्शक.
 • १९२२ : चेन निंग यांग, नोबेल पारितोषिक विजेता चिनी भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९२३ : रामकृष्ण बजाज, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती.
 • १९७८ : एड जॉइस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १५२० : सलीम पहिला, ऑट्टोमन सम्राट.
 • १५३९ : गुरू नानक.
 • १५५४ : फ्रांसिस्को वास्केझ दि कोरोनादो, स्पॅनिश काँकिस्तादोर.
 • १७७४ : पोप क्लेमेंट चौदावा.
 • १८२८ : शक (झुलु सम्राट).
 • १९५२ : कार्लो युहो स्टालबर्ग, नॉर्वेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • १९५६ : फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
 • १९६९ : ऍडोल्फो लोपे मटियोस, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९९१ : दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
 • १९९४ : जी. एन. जोशी, जुन्या पिढीतील भावगीत गायक.
 • २००७ : बोडिन्हो, ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू.
 • २००७ : मार्सेल मार्सू, फ्रांसचा मूकाभिनेता.
 • २०११ : मन्सूर अली खान पटौदी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.