MarathiMati.com - Android App on Google Play Store

१८ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ सप्टेंबर २०१३

१८ सप्टेंबर दिनविशेष(September 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

शिवाजी सावंत - (ऑगस्ट ३१, १९४० - सप्टेंबर १८, २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात

जागतिक दिवस


  • वरिष्ठ नागरिक आदर दिन : जपान.

ठळक घटना, घडामोडी


  • १५०२ : क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत कोस्टा रिकाला पोचला.
  • १७३९ : बेलग्रेडचा तह - बेलग्रेड ऑट्टोमन साम्राज्याच्या हवाली.
  • १८५० : अमेरिकेच्या काँग्रेसने फ्युजिटिव्ह स्लेव्ह ऍक्ट हा कायदा लागू केला.
  • १८८५ : माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगाधोपा सुरू केला.
  • १९०६ : चक्रीवादळ व त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हाँगकाँगमध्ये १०,००० बळी घेतले.
  • १९१९ : नेदरलँड्समध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १९२२ : हंगेरीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
  • १९३४ : सोवियेत संघाला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - पोलंडचे सरकार पळून रोमेनियाला गेले.
  • १९४३ : ज्यूंचे शिरकाण - सोबिबोरची कत्तल.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - ब्रिटिश पाणबुडी एच.एम.एस. ट्रेडविंडने जपानच्या जुन्यो मारु हे जहाज बुडवले. ५,६०० मृत्युमुखी.
  • १९४८ : मार्गारेट चेझ स्मिथ अमेरिकेची पहिली स्त्री सेनेटर झाली.
  • १९६१ : संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस दाग हॅमरशील्डचा विमान अपघातात मृत्यू.
  • १९६२ : र्‍वांडा, बुरुंडी आणि जमैकाला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९७३ : पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९७४ : हरिकेन फिफि होन्डुरासच्या किनाऱ्यावर आले. ५,००० ठार.
  • १९८१ : फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.
  • १९९० : लिश्टनस्टाइनला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९९७ : टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.
  • १९९८ : आयकानची स्थापना.
  • २००१ : ट्रेंटन, न्यू जर्सी येथून कोणीतरी अँथ्रॅक्सचे विषाणू असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली.
  • २००७ : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून घेतल्यावर जनरल परवेझ मुशर्रफने लश्करप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.

जन्म, वाढदिवस


  • ५३ : ट्राजान, रोमन सम्राट.
  • १७०९ : सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.
  • १७६५ : पोप ग्रेगरी सोळावा.
  • १८७६ : जेम्स स्कलिन, ऑस्ट्रेलियाचा ९वा पंतप्रधान.
  • १८९२ : सॅम स्टेपल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९५ : जॉन डिफेनबेकर, कॅनडाचा १३वा पंतप्रधान.
  • १९३७ : आल्फोन्सो रॉबर्ट्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२३ : ऍन, रोमेनियाची राणी.
  • १९४० : ब्रेस मरे, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५० : शबाना आझमी, सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री.
  • १९५८ : विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५८ : डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७० : डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ : लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ९६ : डॉमिशियन, रोमन सम्राट.
  • ११८० : लुई सातवा, फ्रांसचा राजा.
  • १७८३ : लेओनार्ड ऑयलर, स्विस गणितज्ञ.
  • १८७० : चार्ल्स पंधरावा, स्वीडनचा राजा.
  • १९७० : जिमी हेंड्रिक्स, अमेरिकन संगीतकार.
  • १९९२ : एम. हिदायतुल्ला, माजी उपराष्ट्रपती व न्यायाधीश.
  • १९९३ : असित सेन, विनोदी अभिनेते व दिग्दर्शक.
  • १९९४ : व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.
  • १९९५ : काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग, हिंदी कवी.
  • १९९९ : अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक.
  • २००२ : शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
  • २००४ : डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store