१५ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ सप्टेंबर २०१३

१५ सप्टेंबर दिनविशेष(September 15 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या - त्यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी सप्टेंबर १५, इ.स. १८६१ रोजी झाला. त्यांनी देशात इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा पाया घातल्यामुळेच त्यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिन, 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो.

जागतिक दिवस


 • अभियंता दिन : भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून पाळला जातो.

ठळक घटना/घडामोडी


 • १८१२ : नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.
 • १८२० : पोर्तुगालच्या लिस्बन शहरात उठाव.
 • १८२१ : ग्वातेमाला, एल साल्वादोर, हॉन्डुरास, निकाराग्वा आणि कोस्टा रिका या देशांनी स्पेनपासून आपण स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
 • १८३० : लिव्हरपूल आणि मँचेस्टर शहरांमधील रेल्वेसेवा सुरू.
 • १८३१ : न्यू जर्सीमधील कॅम्डन अँड अँबोय रेलरोड या शहरांमधील लोहमार्गावरून जॉन बुल या रेल्वे इंजिनाची सर्वप्रथम धाव.
 • १८३५ : चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोस द्वीपांत पोचला.
 • १८६२ : अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने हार्पर्स फेरी, व्हर्जिनिया हे शहर काबीज केले.
 • १८७३ : फ्रान्स-प्रशियन युद्ध - फ्रान्सने खंडणीचा शेवटचा हप्ता चुकता केल्यावर जर्मन सैन्याच्या शेवटच्या तुकडीने फ्रान्स सोडले.
 • १८९४ : पहिले चीन-जपान युद्ध - प्याँगयांगच्या लढाईत जपानने चीनला हरवले.
 • १९१६ : पहिले महायुद्ध-सॉमची लढाई - सगळ्यात पहिल्यांदा लढाईत रणगाड्यांचा वापर केला गेला.
 • १९३५ : भारतातील दून स्कूलची स्थापना.
 • १९३५ : जर्मनीने देशातील ज्यू व्यक्तींचे नागरिकत्व रद्द केले.
 • १९३५ : जर्मनी स्वस्तिक असलेला ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.
 • १९४० : दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ ब्रिटन - लढाईच्या चरमसीमेवर रॉयल एअर फोर्सने लुफ्तवाफेची असंख्य विमाने पाडली.
 • १९४२ : दुसरे महायुद्ध - [ग्वादालकॅनाल]]जवळ अमेरिकेच्या यू.एस.एस. वास्प या विमानवाहू नौकेवर टॉरपेडोहल्ला.
 • १९४४ : दुसरे महायुद्ध-पेलेल्यूची लढाई.
 • १९४५ : फ्लॉरिडामध्ये मोठे हरिकेन किनाऱ्यावर येउन ३६६ विमाने व २५ ब्लिंप नष्ट झाली.
 • १९४७ : आर.सी.ए. कंपनीने १२एक्स७ निर्वात नळीचे उत्पादन सुरू केले.
 • १९४७ : जपानला टायफून कॅथलीन या मोठ्या वादळाचा तडाखा. १,०७७ ठार.
 • १९४८ : एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.
 • १९५० : कोरियन युद्ध - अमेरिकेचे सैन्य इंचॉन येथे उतरले.
 • १९५२ : संयुक्त राष्ट्रांनी एरिट्रिया इथियोपियाच्या हवाली केले.
 • १९५८ : सेंट्रल रेलरोड ऑफ न्यू जर्सी कंपनीच्या लोकल गाडीला अपघात होऊन ५८ ठार.
 • १९५९ : निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाचा अमेरिकेला भेट देणारा पहिला नेता झाला.
 • १९६८ : सोवियेत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
 • १९७२ : स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स सिस्टमच्या ग्यॉटेबर्गहून स्टॉकहोमला जाणाऱ्या विमानाचे अपहरण.
 • १९७४ : आर व्हियेतनाम फ्लाइट ७२७ या विमानाचे अपहरण. त्यानंतर उतरताना विमान कोसळले. ७५ ठार.
 • १९८१ : सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सर्वप्रथम महिला, न्यायाधीश झाली.
 • १९८१ : व्हानुआतुला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले.
 • १९९८ : एम.सी.आय. कम्युनिकेशन्स आणि वर्ल्डकॉम या कंपनीचे एकत्रीकरण.
 • २००८ : लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले.
 • २०१३ : नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

जन्म/वाढदिवस


 • ९७३ : अल बिरुनी, अरबी गणितज्ञ.
 • १२५४ : मार्को पोलो, इटालियन फिरस्ता.
 • १८३० : पोर्फिरियो दियाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८५७ : विल्यम हॉवर्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८६० : सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
 • १८७६ : शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.
 • १८७९ : जोसेफ ल्योन्स, ऑस्ट्रेलियाचा १०वा पंतप्रधान.
 • १८८१ : एत्तोरे बुगाटी, इटालियन अभियंता.
 • १८८७ : कार्लोस दाविला, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९०४ : उंबेर्तो दुसरा, इटलीचा राजा.
 • १९०९ : सी.एन. अण्णादुराई, तामीळनाडूचे मुख्यमंत्री.
 • १९२१ : पद्मश्री दाजी भाटवडेकर, मराठी रंगभूमीवरील नटश्रेष्ठ.
 • १९३५ : दगडू मारुती तथा दया पवार, दलित साहित्यिक.
 • १९३७ : फर्नान्डो दि ला रुआ, आर्जेन्टिनाचा ५१वा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४६ : टॉमी ली जोन्स, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
 • १९४६ : ऑलिव्हर स्टोन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
 • १९६४ : रॉबर्ट फायको, स्लोव्हेकियाचे पंतप्रधान.
 • १९७१ : नेथन ॲसल, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८९ : चेतन रामलू, न्यू झीलंडचा संगीतकार.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ६६८ : कॉन्स्टान्स दुसरा, बायझेन्टाइन सम्राट.
 • १८५९ : इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता.
 • १९७३ : गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ, स्वीडनचा राजा.
 • २००८ : प्रा. गंगाधर गाडगीळ, ज्येष्ठ साहित्यिक व नवकथाकार.