Download MarathiMati.com's New Android App from Google Play

१३ सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ सप्टेंबर २०१३

१३ सप्टेंबर दिनविशेष(September 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

प्रभा अत्रे - (सप्टेंबर १३, इ.स. १९३२) या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पं सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १२२ : हेड्रियनच्या भिंतीचे बांधकाम सुरू.
 • १८१४ : १८१२चे युद्ध - ब्रिटिश सैन्याला बाल्टिमोर, मेरीलँड जिंकण्यात अपयश. येथून अमेरिकन सैन्याची सरशी होत गेली.
 • १८४७ : मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटने मेक्सिको सिटी जिंकले.
 • १८९९ : अमेरिकेतील सर्वप्रथम जीवघेण्या अपघातात हेन्री ब्लिस मृत्युमुखी.
 • १९०० : पुलांग लुपाची लढाई.
 • १९२३ : मिगेल प्रिमो दि रिव्हेरा स्पेनच्या सर्वेसर्वापदी.
 • १९२९ : लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
 • १९४३ : च्यांग कै-शेक तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९७१ : न्यू यॉर्कच्या ऍटिका तुरुंगात कैद्यांची दंगल थोपवण्यासाठी पोलिस व नॅशनल गार्डला पाचारण. कारवाईत ४२ ठार.
 • १९९९ : मॉस्कोमध्ये दहशतवाद्यांचे बॉम्बस्फोट. ११९ ठार.
 • २००३ : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
 • २००६ : माँत्रियालच्या डॉसन कॉलेजमध्ये किमवीर गिलने एक विद्यार्थ्याला मारले, १९ जखमी केले व नंतर आत्महत्या केली.

जन्म/वाढदिवस


 • १५३३ : एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची, इंग्लंडची राणी.
 • १०८७ : जॉन दुसरा कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
 • १८५१ : वॉल्टर रीड, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.
 • १८५२ : गणेश जनार्दन आगाशे, नामांकित शिक्षक, संस्कृत पंडित, व्युत्पन्न ग्रंथकार व उत्तम वक्ते, इंदूर येथे भरलेल्या १०व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
 • १८५७ : मिल्टन हर्शी, अमेरिकन उद्योगपती.
 • १८६० : जॉन पर्शिंग, अमेरिकन सेनापती.
 • १८६४ : रॉबर्ट कटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८७६ : पर्सी ट्वेंटीमन-जोन्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १८८२ : रमोन ग्राउ, क्युबाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९०२ : आर्थर मिचेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३२ : डॉ. प्रभा अत्रे, किराणा घराण्याच्या गायिका आणि रचनाकार ‘गानप्रभा’.
 • १९६३ : रॉबिन स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६७ : मायकेल जॉन्सन, अमेरिकन धावपटू.
 • १९६८ : चंडिका हथुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६९ : शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९७१ : गोरान इव्हानिसेविच, क्रोएशियाचा टेनिस खेळाडू.
 • १९७३ : महिमा चौधरी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
 • १९७६ : क्रेग मॅकमिलन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८० : वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ८१ : टायटस, रोमन सम्राट.
 • १४३८ : दुआर्ते, पोर्तुगालचा राजा.
 • १५९८ : फिलिप दुसरा, स्पेनचा राजा.
 • १८९३ : मामा परमानंद, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक.
 • १९२८ : श्रीधर पाठक, हिंदी कवी.
 • १९२९ : जतींद्रनाथ दास, भारतीय क्रांतिकारक.
 • १९७१ : केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play