MarathiMati.com - Android App on Google Play Store

१२ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २०१३

१२ सप्टेंबर दिनविशेष(September 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

सवाई गंधर्व - हिदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत. त्यांचे नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.

जागतिक दिवस


  • राष्ट्रीय दिन : केप व्हर्दे.
  • राष्ट्रीय क्रांती दिन : इथियोपिया.

ठळक घटना, घडामोडी


  • ४९० : मॅरेथॉनची लढाई - अथेन्सने पर्शियाला हरवले.
  • १६८३ : व्हियेनाची लढाई - ऑस्ट्रिया व इतर युरोपीय देशांनी ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव केला.
  • १८४७ : मेक्सिकन अमेरिकन युद्ध - दल बदलून मेक्सिकोतर्फे लढणार्‍या अमेरिकन सैनिकांना जनरल विनफील्ड स्कॉटने फाशी दिली.
  • १८५७ : कॅलिफोर्निया गोल्ड रशमध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेउन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज केप हॅट्टेरास पासून १६० मैलावर बुडाले. सोन्यासह ४२६ प्रवाशांना जलसमाधी.
  • १८९० : सॅलिसबरी, र्‍होडेशिया शहराची स्थापना.
  • १९३० : विल्फ्रेड र्‍होड्सने आपल्या १,११०व्या व शेवटच्या प्रथमवर्गीय क्रिकेट सामन्यात ९५ धावा देऊन ५ बळी घेतले.
  • १९३८ : एडोल्फ हिटलरने चेकोस्लोव्हेकियाच्या सुडेटेनलँडमधील जर्मन व्यक्तींना स्वतंत्र करण्याची मागणी केली.
  • १९४० : केनव्हिल, न्यू जर्सी येथे कारखान्यातील स्फोटात ५१ ठार, २०० जखमी.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या पाणबुड्यांनी दोस्त राष्ट्रांचे सैनिक, नागरिक व इटालियन युद्धबंद्यांना घेउन जाणाऱ्या आर.एम.एस. लॅकोनिया जहाजाला बुडवले.
  • १९४३ : ऍब्रुझी येथे पकडून ठेवलेल्या इटलीच्या हुकुमशहा बेनितो मुसोलिनीला जर्मनीच्या कमांडोंनी सोडवून नेले.
  • १९४८ : आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले.
  • १९७४ : इथियोपियाच्या सम्राट हेल सिलासीची लश्करी उठावात उचलबांगडी.
  • १९७९ : इंडोनेशियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेचा भूकंप.
  • १९८० : तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव.
  • १९८३ : लोस मशेतेरोस या टोळीने हार्टफर्ड, कनेक्टिकटमधील बँकेतून ७० लाख अमेरिकन डॉलर पळवले.
  • १९९२ : शायनिंग पाथचा म्होरक्या ऍबिमेल गुझमान पकडला गेला.
  • १९९४ : फ्रँक युजीन कॉर्डरने सेसना १५० प्रकारचे विमान व्हाइट हाउसवर घातले.
  • २००२ : 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
  • २००३ : पॅन ऍम फ्लाइट १०३वर केलेल्या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने लिब्यावरचे आर्थिक निर्बंध संयुक्त राष्ट्रांनी काढले.
  • २००५ : डिझनीलँड हाँगकाँग खुले.
  • २०१२ : दहशतवाद्यांनी लिब्यातील बेंगाझी आणि इजिप्तमधील कैरो शहरांतील अमेरिकन वकीलातींवर हल्ला चढवून वकीलाती नष्ट केल्या लिब्यातील अमेरिकन राजदूत जॉन क्रिस्टोफर स्टीवन्ससह तीन मृत्युमुखी.
  • २०१२ : पाकिस्तानच्या कराची शहरातील कपड्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २८९ ठार.

जन्म, वाढदिवस


  • १४९२ : लॉरेन्झो दि मेदिची दुसरा.
  • १४९४ : फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
  • १५७५ : हेन्री हडसन, इंग्लिश शोधक.
  • १९१३ : जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू.
  • १९३२ : वकार हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९३७ : वेस्ली हॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४८ : मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ : नेथन ब्रॅकेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १२१३ : पीटर दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १३६२ : पोप इनोसंट सहावा.
  • १६१२ : व्हासिली चौथा, रशियाचा झार.
  • १६८३ : अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.
  • १९१८ : जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
  • १९५२ : सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
  • १९८० : सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
  • १९९२ : पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
  • १९९३ : रेमंड बर, अमेरिकन अभिनेता.
  • १९९६ : श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
  • २००३ : जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार, गायक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store