MarathiMati.com - Android App on Google Play Store

१० सप्टेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० सप्टेंबर २०१३

१० सप्टेंबर दिनविशेष(September 10 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

भक्ती बर्वे-इनामदार - (सप्टेंबर १०, इ.स. १९४८ - फेब्रुवारी १२, इ.स. २००१) ह्या मराठी अभिनेत्री होत्या. पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका होती.

जागतिक दिवस


  • राष्ट्र दिन : जिब्राल्टर.
  • शिक्षक दिन : चीन.

ठळक घटना, घडामोडी


  • १८२३ : सिमोन बॉलिव्हार पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १८९७ : लॅटिमरची कत्तल - पेनसिल्व्हेनियामध्ये शेरिफच्या टोळक्याने २० निःशस्त्र खाणकामगारांना ठार मारले.
  • १८९८ : लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने रोममध्ये ठाण मांडले.
  • १९५१ : युनायटेड किंग्डमने इराणविरुद्ध आर्थिक निर्बंध लादले.
  • १९६१ : १९६१ इटालियन ग्रांप्री - चालक वोल्फगांग फोन ट्रिप्सच्या फेरारीला अपघात ट्रिप्स आणि १३ प्रेक्षक ठार.
  • १९६६ : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाबहरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली.
  • १९६७ : जिब्राल्टरने स्पेनमध्ये विलिन होण्यास नकार दिला.
  • १९७४ : गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
  • १९७५ : व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
  • १९७६ : झाग्रेबजवळ ब्रिटिश एरवेझच्या हॉकर सिडली ट्रायडेंट आणि आयनेक्स-एड्रियाच्या डग्लस डी.सी.-९ प्रकारच्या विमानांची टक्कर. १७६ ठार.
  • २००२ : स्वित्झर्लंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

जन्म, वाढदिवस


  • ११६९ : अलेक्सियस दुसरा कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १४८७ : पोप जुलियस तिसरा.
  • १६२४ : थॉमस सिडेनहॅम, इंग्लिश वैद्य.
  • १८७२ : रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू.
  • १८८७ : गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते.
  • १८९२ : आर्थर कॉम्प्टन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९५ : कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक.
  • १९३४ : रॉजर मारिस, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
  • १९४८ : भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
  • १९८९ : संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • २१० : चिन शि ह्वांग, चिनी सम्राट.
  • ९५४ : लुई चौथा, फ्रांसचा राजा.
  • १३०८ : गो-निजो, जपानी सम्राट.
  • १९४८ : फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा.
  • १९६४ : पं.श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.
  • १९७५ : जॉर्ज पेजेट थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९८३ : फेलिक्स ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९८३ : जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
  • २००६ : टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा.
MarathiMati.com - Android App on Google Play Store