MarathiMati.com - Android App on Google Play Store

१ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १ सप्टेंबर २०१३

१ सप्टेंबर दिनविशेष(September 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

भास्करबुवा बखले - म्हणजे भास्कर रघुनाथ बखले (ऑक्टोबर १७, १८६९ - एप्रिल ८, १९२२) हे मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार होते. १९११ साली भास्करबुवांनी भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली.

जागतिक दिवस


  • क्रांती दिन : लिब्या.
  • ज्ञान दिन : रशिया.
  • शिक्षक दिन : सिंगापुर.
  • संविधान दिन : स्लोव्हेकिया.
  • स्वातंत्र्य दिन : उझबेकिस्तान.

ठळक घटना, घडामोडी


  • इ. स. पूर्व ५५०९ : बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
  • १७१५ : फ्रांसचा राजा लुई चौदावा ७२वर्षांच्या राज्यकारभारानंतर मृत्यू पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.
  • १८६२ : अमेरिकन यादवी युद्ध-उत्तरेच्या जनरल विल्यम टी. शेर्मनने घातलेल्या चार महिन्यांच्या वेढ्याला कंटाळून जनरल जॉन बेल हूडने अटलांटातून पळ काढला.
  • १८९४ : हिंकली, मिनेसोटाजवळ लागलेल्या वणव्यात ४००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
  • १८९७ : बॉस्टन सबवेचे उद्घाटन.
  • १९०५ : आल्बर्टा आणि सास्काचेवान कॅनडामध्ये दाखल.
  • १९११ : गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांनी पुणे येथे ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली.
  • १९१४ : सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले.
  • १९२३ : टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व युद्धास तोंड फुटले.
  • १९४७ : भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
  • १९६४ : इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापली.
  • १९६९ : लिब्यात कर्नल मुअम्मर गद्दाफीने सत्ता बळकावली.
  • १९७२ : रेक्याविकमध्ये बॉबी फिशरने बोरिस स्पास्कीला हरवून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद मिळवले.
  • १९७४ : एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
  • १९७९ : पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.
  • १९८३ : शीत युद्ध - कोरियन एर फ्लाइट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
  • १९९१ : उझबेकिस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.

जन्म, वाढदिवस


  • १८७५ : एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.
  • १८९६ : ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.
  • १९०६ : होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२१ : माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२६ : अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४६ : रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४९ : पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.
  • १९५१ : डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ : मोहम्मद अट्टा, सप्टेंबर ११, २००१च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार.
  • १९७६ : क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १०६७ : बाल्ड्विन पाचवा, फ्लँडर्सचा राजा.
  • ११५९ : पोप एड्रियान चौथा.
  • १२५६ : कुजो योरित्सुने, जपानी शोगन.
  • १५७४ : गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु.
  • १५८१ : गुरु रामदास, चौथे शीख गुरु.
  • १७१५ : लुई चौदावा, फ्रांसचा राजा.
MarathiMati.com - Android App on Google Play Store