MarathiMati.com - Android App on Google Play Store

४ ऑक्टोबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१३

४ ऑक्टोबर दिनविशेष(October 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

केशवराव भोसले - (ऑगस्ट ९, १८९० - ऑक्टोबर ४, १९२१) हे मराठी नाट्यसृष्टीतील गायक-अभिनेते होते.

जागतिक दिवस


  • राष्ट्रीय एकता दिन
  • स्वातंत्र्य दिन : लेसोथो.

ठळक घटना, घडामोडी


  • १२०९ : पोप इनोसंट तिसर्‍याने ऑट्टो चौथ्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.
  • १२२७ : खलीफा अल-अदीलची हत्या.
  • १५११ : अरागॉनचा राजा फर्डिनांड दुसरा, व्हेनिसचे प्रजासत्ताक व पोपच्या राष्ट्रांनी एकत्र होउन फ्रांसविरुद्ध पवित्र आघाडी सुरू केली.
  • १५८२ : पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगोरीयन दिनदर्शिकेची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार यावर्षी इटली, पोलंड, पोर्तुगाल व स्पेनमध्ये ऑक्टोबर ४ नंतरचा दिवस ऑक्टोबर १५ होता..
  • १६३६ : विटस्टॉकची लढाई - स्वीडनची सॅक्सनी व पवित्र रोमन साम्राज्यावर मात.
  • १७७७ : जर्मनटाउनची लढाई - सर विल्यम होवच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडच्या सैन्याने जॉर्ज वॉशिंग्टनच्या सैन्याला हरवले.
  • १८२४ : मेक्सिकोने नवीन संविधान अंगिकारले व संघीय प्रजासत्ताकरूप धारण केले.
  • १८३० : बेल्जियमला नेदरलँड्सपासून स्वतंत्र अस्तित्त्व.
  • १८५३ : क्रिमीयन युद्ध - ऑट्टोमन साम्राज्याने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १८८३ : ओरियेंट एक्सप्रेसची पहिली फेरी.
  • १९१० : पोर्तुगालने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. राजा मनुएल दुसरा पळून युनायटेड किंग्डमला आश्रयास गेला.
  • १९१० : बर्म्युडाने आपला नवीन ध्वज अंगिकारला.
  • १९२७ : गुत्झॉन बॉर्ग्लमने माउंट रशमोरचे काम सुरू केले.
  • १९४० : ब्रेनर पास येथे एडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेने सोलोमन द्वीपे काबीज केली.
  • १९५७ : सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
  • १९५८ : फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना.
  • १९६० : ईस्टर्न एरलाइन्स फ्लाइट ३७५ हे लॉकहीड एल. १८८ प्रकारचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडताच कोसळले. ६२ ठार, १० बचावले.
  • १९६५ : पोप पॉल सहावा अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला.
  • १९६६ : बासुटोलँडला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो.
  • १९६७ : ब्रुनेइच्या सुलतान ओमर अली सैफुद्दीन तिसर्‍याने पदत्याग केला. त्याचा मुलगा हसनल बोल्कियाह सुलतानपदी.
  • १९८३ : रिचर्ड नोबलने आपली थ्रस्ट २ ही कार नेव्हाडातील ब्लॅक रॉक वाळवंटात ताशी १,०१९ किमी (६३३.४६८ मैल/तास) वेगाने चालवून उच्चांक प्रस्थापित केला.
  • १९९२ : मोझांबिकमधील गृहयुद्ध संपुष्टात आले.
  • १९९२ : एल ऍलचे बोईंग ७४७-२००एफ प्रकारचे विमान ऍम्स्टरडॅममध्ये निवासी ईमारतीवर कोसळले जमिनीवरील ३८ सह ४३ ठार.
  • १९९३ : मॉस्कोमध्ये लश्कराने संसदेवर रणगाड्यांसह चाल केली.
  • १९९७ : शार्लट, नॉर्थ कॅरोलिना या शहरात १,७३,००,००० अमेरिकन डॉलरचा दरोडा.
  • २००१ : युक्रेनच्या सैन्याने सोडलेले एस-२०० प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून सिबिर एरलाइन्सच्या तुपोलेव्ह टी.यु. १५४ प्रकारच्या विमानावर आदळले. विमान काळ्या समुद्रात कोसळून ७८ ठार.
  • २००४ : स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.

जन्म, वाढदिवस


  • १२८९ : लुई दहावा, फ्रांसचा राजा.
  • १३७९ : हेन्री तिसरा, कॅस्टिलचा राजा.
  • १५५० : चार्ल्स नववा, स्वीडनचा राजा.
  • १६२६ : रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.
  • १८२२ : रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा एकोणिसावा राष्ट्राध्यक्ष.
  • १८४१ : प्रुदेन्ते होजे दि मोरै बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७७ : रेझर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९११ : रेज पर्क्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१४ : म. वा. धोंड, मराठी समीक्षक.
  • १९२० : जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३१ : बेसिल डि'ऑलिव्हेरा, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३६ : डेव्हिड पिथी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९३७ : जॅकी कॉलिन्स, इंग्लिश लेखिका.
  • १९६४ : डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ : आमेर हनीफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १३०५ : कामेयामा, जपानी सम्राट.
  • १५९७ : सार्सा डेंगेल, इथियोपियाचा सम्राट.
  • १९०४ : कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ
  • १९२१ : केशवराव भोसले, मराठी गायक.
  • १९४७ : मॅक्स प्लँक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९८२ : सोपानदेव चौधरी, मराठी कवी.
  • १९९३ : जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.
  • २००२ : भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store