MarathiMati.com - Android App on Google Play Store

९ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ नोव्हेंबर २०१३

९ नोव्हेंबर दिनविशेष(November 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

धोंडो केशव कर्वे - (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिले. हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : कंबोडिया.
  • अल्लामा इकबाल दिन : पाकिस्तान.
  • संशोधक दिन : युरोप.

ठळक घटना, घडामोडी


  • १९०७ : इंग्लंडच्या राजा सातव्या एडवर्डला त्याच्या वाढदिवसानिमित्त कलिनन हीरा भेट देण्यात आला.
  • १९१३ : अमेरिकेच्या ग्रेट लेक्स सरोवरांत आलेल्या वादळात १९ जहाजे बुडाली व २५०पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यू पावल्या.
  • १९१८ : पहिले महायुद्ध - जर्मनीच्या सम्राट विल्हेल्म दुसर्‍याने पदत्याग केल्यावर जर्मनीला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
  • १९२३ : म्युनिकमध्ये नाझी पक्षाने आयोजित केलेला बीयर उठाव पोलिस व सैन्याने चिरडून काढला.
  • १९३७ : जपानने शांघाय शहर जिंकले.
  • १९३८ : जर्मनीत हर्षल ग्रिंझपानने अर्न्स्ट फोन राथची हत्या केली. हे कारण पुढे करून नाझींनी ज्यूंच्या शिरकाणाला सुरुवात केली.
  • १९४७ : जुनागढ भारतात विलीन झाले.
  • १९५३ : कंबोडियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६३ : जपानच्या मीके खाणीत स्फोट होउन ४५८ ठार, ८३९ दवाखान्यात. याच दिवशी जपानमध्ये योकोहामाजवळ तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात १६० ठार.
  • १९८५ : अनातोली कारपोव्हला हरवून गॅरी कास्पारोव्ह सगळ्यात छोटा बुद्धिबळ जगज्जेता झाला.
  • १९९० : नेपाळने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९९० : मेरी रॉबिन्सन आयर्लंडची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्षा झाली.
  • १९९४ : डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध.
  • १९९८ : आपल्या गिर्‍हाइकांना एक किंमत दाखवून वेगळ्याच किमतीला रोखे विकल्याबद्दल नॅस्डॅक शेरबाजारातील दलालसंस्थांना १.०३ अब्ज अमेरिकन डॉलरचा दंड.
  • २००५ : आत्मघातकी दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या अम्मान शहरात बॉम्बस्फोट करून ६० व्यक्तींना ठार केले.
  • २०१३ : सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.

जन्म, वाढदिवस


  • १८४१ : एडवर्ड सातवा, इंग्लंडचा राजा.
  • १८७७ : मोहम्मद इक्बाल, भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी.
  • १८८२ : ज्यो हार्डस्टाफ, सिनियर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८८५ : आल्फ्रेड डिपर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०४ : एडवर्ड व्हान डेर मर्व, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१८ : स्पिरो ऍग्न्यू, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९२३ : डोरोथी डॅन्ड्रिज, श्यामवर्णीय अमेरिकन अभिनेत्री.
  • १९३१ : टॉमी ग्रीनहाउ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३४ : कार्ल सेगन, अमेरिकन अंतराळतज्ञ व इंग्लिश लेखक.
  • १९४३ : जॉन शेफर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७५ : मॅथ्यू सिंकलेर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ९४९ : कॉन्स्टन्टाईन सातवा, बायझेन्टाईन सम्राट.
  • ११८७ : गाओझॉँग, चीनी सम्राट.
  • १५०४ : फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १९३७ : राम्से मॅकडोनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९४० : नेव्हिल चेंबरलेन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९५३ : अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबियाचा राजा.
  • १९६२ : धोंडो केशव कर्वे, मराठी समाजसुधारक आणि भारतरत्न पुरस्कर्ते.
  • १९६७ : बाबूराव पेंढारकर, मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते.
  • १९७० : चार्ल्स दि गॉल, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००३ : बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि.
  • २००५ : के. आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.
MarathiMati.com - Android App on Google Play Store