MarathiMati.com - Android App on Google Play Store

७ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ७ नोव्हेंबर २०१३

७ नोव्हेंबर दिनविशेष(November 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

केशवसुत - (कृष्णाजी केशव दामले) (मार्च ७, १८६६:मालगुंड - नोव्हेंबर ७, १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.

जागतिक दिवस


  • ऑक्टोबर क्रांती दिन - रशिया

ठळक घटना, घडामोडी


  • १८३७ : गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणार्‍या एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसर्‍यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू
  • १९०७ : डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना
  • १९९६ : नायजेरियाचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान लागोसपासून आग्नेय दिशेस ४० मैलावर कोसळले. १४३ ठार
  • १९९६ : नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण
  • २००० : हिलरी क्लिंटनची अमेरिकेच्या सेनेटवर निवड
  • २००१ : एकमेव स्वनातीत प्रवासी विमान कॉँकोर्ड १५ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा आकाशात झेपावले
  • २००२ : इराणने अमेरिकन वस्तूंच्या जाहिरातींवर बंदी घातली

जन्म, वाढदिवस


  • ९९४ : इब्न हज्म, अरब तत्त्वज्ञानी
  • १८५८ : बिपिनचंद्र पाल, लाल-बाल-पाल या त्रयीतील एक.
  • १८६७ : मेरी क्युरी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ
  • १८७४ : जोसेफ विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
  • १८७६ : चार्ली टाउनसेन्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १८७६ : टेड आर्नोल्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १८७९ : लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी
  • १८८८ : सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ
  • १८८९ : लॉर्ड लायोनेल टेनिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १८८९ : डस्टी टॅपस्कॉट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
  • १९१८ : बिली ग्रॅहाम, अमेरिकन धर्मप्रसारक
  • १९५४ : कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता
  • १९५९ : श्रीनिवास - भारतीय पार्श्वगायक
  • १९६१ : रॉन हार्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९६२ : मार्टिन सुआ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९७२ : तनवीर मेहदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
  • १९७९ : मंजुरल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू
  • १९८० : जेम्स फ्रँकलिन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९८० : कार्तिक, भारतीय पार्श्वगायक
  • १९८१ : अनुष्का शेट्टी, भारतीय अभिनेत्री

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९०५ : केशवसुत, आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक.
  • १९१० : लिओ टॉल्स्टॉय, रशियन लेखक
  • १९६७ : जॉन गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष
  • २००० : चिदंबरम् सुब्रमणियम्, भारतीय राजकारणी
  • २००६ : पॉली उमरीगर, भारतीय क्रिकेट खेळाडू
  • २००९ : सुनिताबाई देशपांडे, पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी, लेखिका.
MarathiMati.com - Android App on Google Play Store