MarathiMati.com - Android App on Google Play Store

६ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ नोव्हेंबर २०१३

६ नोव्हेंबर दिनविशेष(November 6 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

दिनकर द. पाटील - (नोव्हेंबर ६, १९१५ - ऑक्टोबर २३, २००५) हे मराठी चित्रपटदिग्दर्शक, कथालेखक, पटकथाकार होते.

जागतिक दिवस


  • संविधान दिन : डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान
  • गुस्ताफस ऍडोल्फस दिन : स्वीडन.

ठळक घटना, घडामोडी


  • १५२८ : समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला
  • १८४४ : डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले
  • १८६० : अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला
  • १८६१ : जेफरसन डेव्हिस कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला
  • १८६५ : अमेरिकन यादवी युद्ध - जगप्रदक्षिणा करून आलेल्या दक्षिणेच्या सी.एस.एस. शेनान्डोआह या युद्धनौकेने उत्तरेच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले
  • १९१३ : दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्‍यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली
  • १९६५ : क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले
  • १९८५ : कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले
  • १९८६ : ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्सचे बोईंग २३४एलआर प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार
  • २००२ : पॅरिसहून व्हियेनाला जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग. १२ ठार
  • २००४ : इंग्लंडमध्ये उफ्टन गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी
  • २००५ : अमेरिकेच्या एव्हान्सव्हिल शहराजवळ टोर्नॅडोमुळे २५ ठार
  • २००५ : म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली

जन्म, वाढदिवस


  • १४९४ : सुलेमान, ऑट्टोमन सम्राट
  • १६६१ : कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा
  • १८४१ : आर्मांड फॅलियेरेस, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष
  • १८६० : इग्नास पादेरेव्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष
  • १८७६ : अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १८९३ : एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती
  • १८९७ : जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९१५ : दिनकर द. पाटील, चित्रपट कथाकार, दिग्दर्शक.
  • १९१९ : ऍलन लिसेट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९२१ : जॉफ राबोन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९२७ : एरिक ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
  • १९४६ : सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री
  • १९४८ : ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार
  • १९५६ : ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १२३१ : त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट
  • १४०६ : पोप इनोसंट सातवा
  • १६३२ : गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडनचा राजा
  • १६५६ : होआव चौथा, पोर्तुगालचा राजा
  • १७९६ : कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी
  • १८३६ : चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा
  • १८९३ : पीटर इल्यिच त्चैकोव्स्की, रशियन संगीतकार
  • १९२५ : खै दिन्ह, व्हियेतनामचा राजा
  • १९२९ : मॅक्सिमिलियन फोन बाडेन, जर्मनीचा चान्सेलर
  • १९८५ : संजीवकुमार, प्रसिद्ध हिंदी अभिनेते.
  • १९८७ : भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते
MarathiMati.com - Android App on Google Play Store