MarathiMati.com - Android App on Google Play Store

२४ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २४ नोव्हेंबर २०१३

२४ नोव्हेंबर दिनविशेष(November 24 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

केशव तानाजी मेश्राम - (इ.स. १९३७ - २००७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक होते.

जागतिक दिवस


  • राष्ट्रीय ग्राहक दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १९२२ : आयरिश मुक्त राष्ट्राने लेखक आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य अर्स्किन चाइल्डर्स आणि इतर आठांना बेकायदेशीर रीत्या रिव्हॉल्वर बाळगल्याबद्दल गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
  • १९४० : दुसरे महायुद्ध-स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध-यु.एस.एस. लिस्कोम बे या युद्धनौकेला टोरपेडो लागून बुडाली. ६५० ठार.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध-टोक्योवर ८८ अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ला चढवला. जपानी राजधानीवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला होता.
  • १९६३ : जॉन एफ. केनेडीचा खून करणाऱ्या ली हार्वे ऑसवाल्डचा डॅलस पोलिस स्थानकात जॅक रुबीने खून केला. योगायोगाने या प्रसंगाचे दूरचित्रवाणीवर देशभर प्रक्षेपण झाले.
  • १९६५ : जोसेफ डेझरे मोबुटुने काँगोमध्ये उठाव करून सत्ता बळकावली.
  • १९६६ : टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार.
  • १९७१ : डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही.
  • १९७६ : तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी.

जन्म, वाढदिवस


  • १६५५ : चार्ल्स अकरावा, स्वीडनचा राजा.
  • १६९० : हुनिपेरो सेरा, स्पेनचा ख्रिश्चन धर्मप्रसारक.
  • १७८४ : झकॅरी टेलर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५३ : बॅट मास्टरसन, अमेरिकन गुंड.
  • १८६९ : अँतोनियो ऑस्कार कार्मोना, पोर्तुगालचा ९७वा पंतप्रधान आणि ११वा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७७ : आल्बेन बार्कली, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १८७७ : कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर.
  • १८८४ : इत्झाक बेन-झ्वी, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८८८ : डेल कार्नेगी, अमेरिकन लेखक.
  • १८९४ : हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९९ : टेड बंडी, अमेरिकन मारेकरी.
  • १९३७ : केशव मेश्राम, मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार व समीक्षक.
  • १९५५ : इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ : अरुंधती रॉय, भारतीय लेखिका.
  • १९७८ : कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ६५४ : सम्राट कोतोकू, जपानी सम्राट
  • १८४८ : विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
  • १९२९ : जॉर्जेस क्लेमेन्सू, फ्रांसचा पंतप्रधान
  • १९६३ : मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
  • १९६५ : अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह, कुवैतचा अमीर
  • १९९१ : फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार
  • २००९ : समाक सुंदरावेज, थायलंडचा पंतप्रधान
MarathiMati.com - Android App on Google Play Store