MarathiMati.com - Android App on Google Play Store

२३ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २३ नोव्हेंबर २०१३

२३ नोव्हेंबर दिनविशेष(November 23 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

डॉ. सर जगदीशचंद्र बोस - (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जैव, भौतिकी, वनस्पति विज्ञान तसेच पुरातत्व वैज्ञानिक होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १८०८ : तुदेलाची लढाई : फ्रांस व पोलंडने स्पेनचा पराभव केला.
  • १९०३ : कॉलोराडोच्या गव्हर्नर जेम्स पीबॉडीने क्रिपल क्रीक येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी सैनिक पाठवले.
  • १९१४ : सात महिने मुक्काम ठोकल्यावर व्हेराक्रुझमधून अमेरिकेने आले सैन्य काढून घेतले.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - रोमेनिया अक्ष राष्ट्रांत सामील.
  • १९४६ : व्हियेतनाम युद्ध - फ्रांसच्या आरमाराने है फाँग गावावर केलेल्या हल्ल्यात ६,००० नागरिक ठार.
  • १९५५ : युनायटेड किंग्डमने कोकोस द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या हवाली केला.
  • १९८० : इटलीच्या दक्षिण भागात झालेल्या भूकंपांत सुमारे ४,८०० ठार.
  • १९८५ : अथेन्सहून कैरोला जाणाऱ्या इजिप्तएर फ्लाइट ६४८ या विमानाचे अपहरण. माल्टामध्ये विमान उतरल्यावर इजिप्तच्या कमांडोंनी विमानावर घातलेल्या धाडीत ६० ठार.
  • १९९६ : इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ९६१ या विमानाचे अपहरण. कोमोरोस द्वीपांजवळ इंधन संपल्याने हे विमान हिंदी महासागरात कोसळले. १२५ ठार
  • २००३ : जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्ष एदुआर्द शेवर्दनात्झेने राजीनामा दिला.
  • २००५ : एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००७ : एम.एस. एक्सप्लोरर हे क्रुझ शिप[मराठी शब्द सुचवा] आर्जेन्टिना जवळ हिमनगाला धडकून बुडाले. सगळ्या १५४ प्रवासी व खलाश्यांचा बचाव.

जन्म, वाढदिवस


  • ९१२ : ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १२२१ : आल्फोन्सो दहावा, कॅस्टिलचा राजा.
  • १६१६ : जॉन वॉलिस, ब्रिटिश गणितज्ञ.
  • १७०५ : थॉमस बर्च, इंग्लिश इतिहासकार.
  • १७१५ : पिएर चार्ल्स ले मोनिये, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
  • १८०४ : फ्रँकलिन पीयर्स, अमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
  • १८२० : आयझॅक टॉडहंटर, ब्रिटिश गणितज्ञ.
  • १८३७ : योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, नोबेल पारितोषिक विजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८५९ : बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
  • १८६० : ह्यालमार ब्रँटिंग, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडनचा पंतप्रधान.
  • १८७२ : कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी लेखक.
  • १८८७ : हेन्री मोझली, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९७ : निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
  • १९२५ : होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५० : चक शुमर, अमेरिकन राजकारणी.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९३७ : जगदीश चंद्र बोस, भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ.
  • १९८३ : गणेश विनायक अकोलकर, मराठी शिक्षणतज्‍ज्ञ आणि शिक्षणविषय पुस्तकांचे लेखक.
  • २००० : बाबुराव सडवेलकर, मराठी चित्रकार, कलासमीक्षक आणि चित्रकला या विषयावरचे सिद्धहस्त लेखक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store