२ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ नोव्हेंबर २०१३

२ नोव्हेंबर दिनविशेष(November 2 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

जॉर्ज बर्नार्ड शॉ - (जुलै २६, १८५६ : डब्लिन, आयर्लंड - नोव्हेंबर २, इ.स. १९५० : हर्टफर्डशायर, इंग्लंड) हे आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे सह-संस्थापक होते. संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १९१४ : पहिले महायुद्ध - रशियाने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले
 • १९३० : हेल सिलासी - इथियोपियाच्या सम्राटपदी
 • १९४७ : कॅलिफोर्नियात स्प्रूस गूसचे एकमेव उड्डाण
 • १९५३ : पाकिस्तानने आपले नाव बदलून पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले
 • १९६० : लेडी चॅटर्लीझ लव्हर हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल पेंग्विन बूक्सवरील अश्लीलतेच्या खटल्यातून प्रकाशकाची निर्दोष सुटका
 • १९६३ : दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष न्गो दिन्ह दियेमची हत्या
 • १९६४ : सौदी अरेबियाच्या राजा सौदला सत्तेवरुन हुसकून लावून त्याचा भाऊ फैसल राजा झाला
 • १९७४ : सोलमध्ये नाइटक्लबला लागलेल्या आगीत ७४ ठार
 • २००० : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात(चित्रीत) पहिले रहिवासी पोचले

जन्म/वाढदिवस


 • १०८२ : सोंग हुईजोंग, चीनी सम्राट
 • १७५५ : मेरी आँत्वानेत, फ्रेंच सम्राज्ञी
 • १७९५ : जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष
 • १८४४ : महमद चौथा, ऑट्टोमन सम्राट
 • १८६५ : वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष
 • १८६५ : फ्रेडरिक बर्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
 • १८७७ : व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
 • १८७७ : आगा खान तिसरा, शिया इमाम
 • १८९१ : हॅरी इलियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
 • १९०८ : फ्रेड बेकवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
 • १९२८ : जेरी अलेक्झांडर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
 • १९३५ : मोहम्मद मुनाफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
 • १९३८ : सोफिया, स्पेनची राणी
 • १९६५ : शाहरुख खान, भारतीय अभिनेता
 • १९८१ : इरफान फझील, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १२८५ : पीटर तिसरा, अरागॉनचा राजा
 • १३२७ : जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा
 • १९३५ : जेम्स कॅमेरोन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
 • १९५० : जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक
 • १९६३ : न्गो दिन्ह दियेम, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष