MarathiMati.com - Android App on Google Play Store

१९ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १९ नोव्हेंबर २०१३

१९ नोव्हेंबर दिनविशेष(November 19 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

इंदिरा गांधी - (नोव्हेंबर १९,इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

जागतिक दिवस


  • नागरिक दिन

ठळक घटना, घडामोडी


  • १४९३ : क्रिस्टोफर कोलंबस आदल्या दिवशी पाहिलेल्या बेटावर उतरला व त्याचे नामकरण सान हुआन बॉतिस्ता (आता पोर्तो रिको) असे केले.
  • १८६३ : अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने गेटिसबर्गचे भाषण केले.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - एच.एम.एस. सिडनी आणि एच.एस.के. कॉर्मोरानमध्ये लढाई. दोन्ही युद्धनौका बुडाल्या, ऑस्ट्रेलियाचे ६४५ तर जर्मनीचे ७७ खलाशी मृत्युमुखी.
  • १९४२ : स्टालिनग्राडची लढाई - जनरल जॉर्जी झुकोव्हच्या नेतृत्त्वाखाली ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू झाली.
  • १९४३ : ज्यूंचे शिरकाण - जानोव्सका छळछावणीतील कैद्यांच्या फसलेल्या उठावानंतर नाझी सैनिकांनी सुमारे ६,००० ज्यूंना ठार मारले.
  • १९४६ : अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
  • १९६९ : अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.
  • १९७७ : त्रांसपोर्तेस एरियोस पोर्तुगीझेस कंपनीचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान मदेरा द्वीपसमूहात कोसळले. १३० ठार.
  • १९७९ : इराणच्या नेता आयातोल्ला रुहोल्ला खोमेनीने तेहरानमध्ये ओलिस धरलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी १३ स्त्री व श्यामवर्णियांची मुक्तता केली.
  • १९८४ : मेक्सिको सिटीतील तेलसाठ्याला लागलेल्या आगीत सुमारे ५०० ठार.
  • १९९८ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.
  • १९९८ : फिंसेंत फान घोचे पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट विदाउट बियर्ड ७ कोटी १५ लाख अमेरिक डॉलरला विकले गेले.
  • १९९९ : चीनने शेन्झू १ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९३१ : शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
MarathiMati.com - Android App on Google Play Store